आकाशवाणी कॅज्युअल अनाउन्सर युनियन ची नवीन कार्यकारिणीची निवडणूक नवी दिल्लीत
आकाशवाणी कॅज्युअल अनाउन्सर युनियन ची नवीन कार्यकारिणीची निवडणूक नवी दिल्लीत
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर : दि.११ : आकाशवाणी कॅज्युअल अनाउन्सर अँड कम्पेअर युनियन (नोंदणीकृत,नवी दिल्ली)(AIRCACU )च्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक दिनांक १३ जुलै २०२५, रविवारी नवी दिल्ली येथे होणार आहे.
युनियनचे सरचिटणीस श्रीपाल शर्मा, (सुरतगड) यांनी माहिती दिली की दर तीन वर्षांनी युनियनच्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक नवी दिल्ली येथे होते. या संदर्भात, युनियनची सर्वसाधारण सभा १३ जुलै रोजी सकाळच्या सत्रात होणार आहे, ज्यामध्ये मागील कार्यकाळातील कामांवर आणि आगामी अजेंड्यावर खुली चर्चा होईल. दिल्लीतील कोषाध्यक्ष राधा पाठक निधीशी संबंधित लेखाजोखा सादर करतील. देशभरातील सुमारे ४० आकाशवाणी केंद्रांमधून शेकडो युनियन सदस्य दुपारच्या सत्रात सर्वसाधारण सभेत आणि निवडणुकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचतील. आकाशवाणी अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील विविध आकाशवाणी केंद्रांमधून जास्तीत जास्त युनियन सदस्य सर्वसाधारण सभा आणि निवडणुकीत सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष हरिकृष्ण शर्मा (शिमला) यांनी माहिती दिली की, नवीन कार्यकारिणीच्या पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी समीर गोस्वामी (छत्तरपूर), सुनील चिपाडे (बिलासपूर) आणि डॉ. नरेंद्र चहल (हिसार) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. या दरम्यान, अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, चार उपाध्यक्ष (दोन महिला, दोन पुरुष), विविध कार्यक्षेत्रांसाठी आठ सचिवांसह तीन कार्यकारी सदस्यांसाठी निवडणूक घेतली जाईल.
युनियनचे प्रेस सचिव नरेश वर्मा (सुरतगड) यांनी माहिती दिली की, कॅज्युअल सर्वसाधारण सभा आणि कार्यकारिणी निवडीसाठी देशभरातून दिल्लीला येणाऱ्या आकाशवाणी केंद्रांच्या सर्व उद्घोषक आणि सदस्यांच्या राहण्याची, चहा, नाश्ता आणि जेवणाची सर्व व्यवस्था सध्याच्या कार्यकारिणीने केली आहे. निवडणुकीनंतर, १३ जुलै रोजी, युनियनच्या सर्व कामाची जबाबदारी नवीन कार्यकारिणीकडे सोपवण्यात येईल. या दरम्यान, संपूर्ण व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी विद्यमान कार्यकारिणीचे सर्व सदस्य, विद्यमान वरिष्ठ उपाध्यक्षा संग्या टंडन (बिलासपूर) यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहतील. या युनियन मध्ये महाराष्ट्र,गुजरात,राजस्थान, मध्यप्रदेश,कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, छत्तीसगड,उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड,पंजाब, हरियाणा,बिहार,झारखंड, प.बंगाल,मणिपूर, राजधानी दिल्ली सह संपूर्ण भारतातील आकाशवाणी केंद्रातील विविध राज्याचे कॅज्युअल अनाउन्सर आणि कंपेअर सदस्य आहेत अशी माहिती या युनियनचे महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष आदिनाथ अन्नदाते यांनी दिली.



