Breaking
ब्रेकिंग

‘कॅरीबॅगशी नाते तोडा पर्यावरणाची नाते जोडा, ‘स्नेहबंध’चे प्लास्टिक मुक्ती अभियान

0 3 9 0 8 1

‘कॅरीबॅगशी नाते तोडा पर्यावरणाची नाते जोडा,
‘स्नेहबंध’चे प्लास्टिक मुक्ती अभियान

प्रतिनिधी : संवेद वायकर

अहिल्यानगर – यंदाच्या पर्यावरण दिवसाची संकल्पना (थीम) ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करणे’ ही आहे. याला अनुसरूनच स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने ‘कॅरीबॅगशी नाते तोडा पर्यावरणाशी नाते जोडा’ ही संकल्पना घेऊन प्लास्टिक मुक्ती अभियान राबविणार आहे.

या अभियानाच्या पोस्टरचे आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. माणसासह अन्य प्राणी जीवनही धोक्यात आले आहे. प्लास्टिकचे विघटन आणि पुनर्प्रक्रियेबाबत जगभर विविध दावे केले जात असले आणि प्लास्टिकच्या निर्मितीवर बंधने येत असली तरी प्लास्टिकमुक्तीचे आव्हान कायम आहे. 

आरोग्यास घातक व पर्यावरणास सर्वात जास्त धोका प्लास्टिकमुळे प्रदुषणही वाढत आहे. राज्य शासनही प्लास्टिक बंदीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. त्यामुळे आपण सर्वांनी प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा संकल्प करूया असे डॉ. उद्धव शिंदे म्हणाले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे