श्री सप्तश्रृंगीच्या भाविकांसाठी अमळनेर शहरातील जड वाहतुक बंद ठेवा – – अध्यक्ष पंकज शेटे ( संकल्प युवा फाऊंडेश )
अमळनेर पोलीस स्टेशनचे पो. नि. दत्तात्रय निकम यांना दिले निवेदन

श्री सप्तश्रृंगीच्या भाविकांसाठी अमळनेर शहरातील जड वाहतुक बंद ठेवा – – अध्यक्ष पंकज शेटे ( संकल्प युवा फाऊंडेश )
अमळनेर पोलीस स्टेशनचे पो. नि. दत्तात्रय निकम यांना दिले निवेदन

प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर:-चोपडा से अमळनेर या मार्गावर मोठ्या संख्येने पदयात्री आणि भाविक पायी प्रवास करतात.
दि. २६ मार्च २०२६ ते ७ मार्च २०२६ या कालावधीत श्री सप्तश्रृंगी गड येथे दर्शनासाठी पायी जाणाऱ्या संख्या भोवचा प्रमाणावर असणार आहे. या संदर्भात खालील बाबीकडे आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो सुरक्षतेचा प्रश्न सदर मार्गावर अवजड जड वाहनाची ये-जा सतत सुरु असते. पायी चालणाऱ्या भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अवजड वाहने धोकादायक ठरू शकतात.
वाहतुकीचा अडथळा भाविकांच्या गर्दीमुळे जड वाहनांना मार्ग काढणे कठीण होते, ज्यामुळे वाहतूक कोडी होऊन भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागतो.अपघाताची शक्यता रात्रीच्या वेळी किया वळणाच्या रस्त्यावर जड वाहनामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
भाविकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या सामाजिक भावनेतून दिनांक २६/०३/२०२६ रोजी सकाळी ६.०० वाजेपासुन ते दिनांक २७/०३/२०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत चोपडा ते अमळनेर हद्दीपर्यंत सर्व प्रकारची जड व अवजड वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात यावी किंवा पर्यायी मार्गाने वळवण्यात यावा ही नम्र विनती.तरी आपण या निवेदनाचा गांभिर्याने विचार करुन योग्य तो आदेश पोलीस प्रशासनाला यावा ही विनंती युवा संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज शेटे व कार्यकर्ते यांनी केली आहे .



