सोलापूर जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्राचे कार्य उत्कृष्ट :उपमहासमादेशक जालिंदर सुपेकर
सोलापूर जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र येथे भेट देऊन केली पहाणी
सोलापूर जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्राचे कार्य उत्कृष्ट :उपमहासमादेशक जालिंदर सुपेकर
सोलापूर जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र येथे भेट देऊन केली पहाणी

करमाळा (विशेष प्रतिनिधी सचिन जव्हेरी )
सोलापूर जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र येथे होमगार्ड संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपमहासमादेशक जालिंदर सुपेकर यांनी अचानक नुकतीच भेट देवून तेथील संपुर्ण परिसर,होमगार्ड प्रशिक्षणावेळी होमगार्ड यांना मिळणाऱ्या सुविधा,परिसराची व कवायत मैदानाची पहाणी केली. या पहाणी नंतर त्यांनी अतिशय समाधान व प्रशिक्षण केंद्रातील स्वच्छता-टापटिप,प्रशिक्षणार्थी होमगार्ड यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा पाहुन त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक तथा सोलापूर जिल्हा समादेशक प्रितम यावलकर
यांचे खास करुन अभिनंदन व कौतुक केले.
यावेळी उपमहासमादेशक जालिंदर सुपेकर यांचे सोबत सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक तथा सोलापूर जिल्हा होमगार्डचे समादेशक प्रितम यावलकर हे उपस्थित होते.
सोलापूर होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथे होमगार्डचे उजळणी प्रशिक्षण शिबीर क्रमांक 6/15 सुरू आहे. सदर प्रशिक्षण केंद्राला भेट देण्यासाठी ते आले असता सोलापूर जिल्हा होमगार्डचे केंद्रनायक मळसिद्ध कोकरे यांच्या नेतृत्वाखालील 1/20 चा सन्मान गार्ड उपमहासमादेशक जालिंदर सुपेकर यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर श्री. सुपेकर यांनी संपुर्ण शिबिराची माहीती व पहाणी घेत सोलापूर जिल्ह्यातील होमगार्ड यांचेही कौतुक केले आणि वृक्षलागवडीचे महत्त्व सांगुन झाडे लावा झाडे जगवा असे आवाहन केले. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीही सोलापूर जिल्ह्यातील होमगार्ड यांचे कौतुक करून झाडे लावण्याचे आवाहन केले तर अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक प्रितम यावलकर यांनी केंद्रनायक मळसिद्ध कोकरे यांच्या योग्य नियोजनामुळे बंदोबस्त काळात असो अगर प्रशिक्षण शिबीरात असो कधीही अपुरी संख्या राहीलेली नसल्याचे सांगून त्यांचे योग्य मार्गदर्शनामुळे होमगार्डच्या कोणत्याही तक्रारी दिसुन येत नाहीत हे नुकतेच होमगार्डच्या त्रैमासिक संमेलनात पहावयास मिळाले अशा पदधतीने श्री कोकरे यांचे कौतुक केले.
यावेळी सोलापूर जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक सुनिल चव्हाण, शिबीरप्रमुख व सोलापूर शहर होमगार्ड पथकाचे समादेशक अधिकारी राहुल इंगळे,मानसेवी निदेशक अमित चव्हाण,एकनाथ पवार,कर्तव्य अधिकारी सिद्धराम कुंभार, संतोष कुंभार यांसह 70 सोलापूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी होमगार्ड उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्राची स्वच्छता-टापटीप,प्रशिक्षणार्थी होमगार्ड यांची सुख सुविधा,वृक्षलागवड,आणि दिलेली देखणी मानवंदना यावर खुश होत व समाधान व्यक्त करत उपमहासमादेशक जालिंदर सुपेकर यांनी मानवंदनेचे नेतृत्व करणारे केंद्रनायक मळसिद्ध कोकरे व सन्मान गार्ड यांना रिवार्ड जाहीर केले आहेत.



