अहिल्यानगर वन विभागाचा राज्यात प्रथम क्रमांक – उपवनसंवरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनतर्फे सन्मान
अहिल्यानगर वन विभागाचा राज्यात प्रथम क्रमांक – उपवनसंवरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनतर्फे सन्मान
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम” या उपक्रमांतर्गत जिल्हा स्तरावरील स्पर्धेत अहिल्यानगर वन विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशस्वी कामगिरीबद्दल स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी उपवनसंवरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांचा अहिल्यानगर किल्ल्याची प्रतिकृती देऊन सन्मान केला. यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
उपवनसंवरक्षक सालविठ्ठल हे विभागात रुजू झाल्यापासून विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले. सुलभ प्रशासन, जनतेसाठी सेवा-सुविधा, कार्यालयीन व पर्यटन स्थळांची स्वच्छता, तसेच रोपवन, रोपवाटिका सेवा सुधारणा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. परिणामी, अहिल्यानगर वन विभागास राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाला.
‘स्नेहबंध’ चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, अहिल्यानगर वन विभागाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. सालविठ्ठल यांचे नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांचे एकत्रित प्रयत्न कौतुकास्पद आहेत. हा सन्मान म्हणजे जनसेवेसाठी प्रामाणिक काम करणाऱ्यांना दिलेला योग्य सन्मान आहे.



