अहिल्यानगरचे दीपक पाचपुते ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता’ म्हणून सन्मानित
माहिती अधिकार नागरिक समूहाचे तिसरे राज्यस्तरीय महाअधिवेशन पुण्यात उत्साहात संपन्न*
अहिल्यानगरचे दीपक पाचपुते ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता’ म्हणून सन्मानित
*माहिती अधिकार नागरिक समूहाचे तिसरे राज्यस्तरीय महाअधिवेशन पुण्यात उत्साहात संपन्न*
नगर / प्रतिनिधी: शिवा म्हस्के
महाराष्ट्र राज्यात भष्ट्राचार मध्ये तिसरा क्रमांक आला अहवालानुसार पुढे आले आहे.तसेच पुणे राज्यात प्रथम क्रमांक शहर भष्ट्राचार मध्ये हे अंत्यंत धोकादायक आहे. आपल्या देशात माहिती अधिकार कायद्नयाच्या अंमलबजावणी मुळे अनेक भष्ट्राचार बाहेर येत आहे. ज्ञानमाता
सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरिक समूहाचे तिसरे राज्यस्तरीय महाअधिवेशन दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पुण्यातील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कलादालन, येरवडा येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून असंख्य माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या अधिवेशनात सहभाग घेतला. पारदर्शक शासन, नागरिकांचा सहभाग आणि माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत विचारमंथन झाले.
या अधिवेशनात प्रमुख वक्ते म्हणून सजग नागरिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष विवेक वेलणकर सर, तसेच नामदेवराव जाधव सर (अध्यक्ष – सनय छत्रपती शासन), दिलीप फडके सर आणि विलास ठोसर सर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. वक्त्यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून शासन अधिक जबाबदार करण्यासाठी जनजागृती व सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळी काझी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांना “राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता” या सन्मानाने गौरविण्यात आले. हा पुरस्कार ज्ञानमाता सेवाभावी संस्था तर्फे त्यांच्या जनहितातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रकाश उघडे सर, सागर इसवे सर, मंगलदास निकाळजे सर, रमेश शेडाळे, योगेश करपे आदी मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पारदर्शक शासनाच्या चळवळीला नवी ऊर्जा मिळाली आहे.



