Breaking
ब्रेकिंग

बेपारी मोहल्ला येथील कत्तल खान्यावर कोतवाली पोलिसांची कारवाई …

गोवंशीय जातीचे गोमासा सह 6,60,000 रू .च्या मुद्देमालासह 2 आरोपी अटक- - कोतवाली पोलिसांची  कामगिरी

0 3 9 0 6 1

बेपारी मोहल्ला येथील कत्तल खान्यावर कोतवाली पोलिसांची कारवाई …

 गोवंशीय जातीचे गोमासा सह 6,60,000 रू .च्या मुद्देमालासह 2 आरोपी अटक- – कोतवाली पोलिसांची  कामगिरी

जिल्हा प्रतिनिधी : महेश चव्हाण

अहिल्यानगर दि 9 /    कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कुरेशी मज्जिद शेजारी, आर आर बेकरी समोर बेपारी मोहल्ला झेंडीगेट जि.अ. नगर येथे एका बंद वाडग्यामध्ये गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल होत आहे. तरी सदर ठिकाणी जावुन खात्री करा व काही आढळुन आल्यास छापा कारवाई करा असा आदेश दिल्याने सपोनि श्रीमती योगीता कोकाटे, पोहेकों/ इनामदार,पोकॉ/तानाजी पवार ,पोकों/ दिपक रोहकले,पोकों/सुरज कदम,पोकों/ लोळगे, पोकों/ सुजय हिवाळे पोहेकॉ/ संभाजी कोतकर असे बातमीतील नमुद ठिकाणी जावुन थोडे अंतरावर आमचे वाहने उभी करुन सदर ठिकाणी पायी चालत गेलो असता कुरेशी मज्जिद शेजारी, आर आर बेकरी समोर बेपारी मोहल्ला झेंडीगेट जि.अ.नगर येथे एका बंद वाडग्याचे गेट सरकावुन आतमध्ये प्रवेश केला असता फरशीवर गोवंशीय जनावरांची कत्तल करुन त्याचे लहान मोठे मांस, आतडे, हार्ड कापुन तुकडे केलेले तसेच जमीनीयर सर्वत्र रक्त सांडलेले, वजन काटा, सुरा दिसलेने सदर ठिकाणी 23- 10 वा. चे सुमा. आजु बाजुस बारकाईने पाहणी करत असताना सदर ठिकाणी दोन इसम दिसुन आले त्यावेळी त्यांना जागीच पकडुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव 1) -अब्दुल हक फकीर मोहंमद कुरेशी उर्फ (काका) वय -52 वर्ष रा. कुरेशी मोहल्ला, आर. आर बेकरी समोर झेंडीगेट व 2) नफिस कुरेशी वय 27 वर्ष रा सदर असे असल्याचे सांगितले त्यांना सदरचे वाडग्याचे मालकी हक्काबाबत विचारले असता त्यांनी सागितले की आमचेच असुन ते आम्हीच चालवतो असे सांगितल्या नंतर सदर वाडग्यामध्ये असलेल्या गोवंशीय जातीचे मांस हे त्याचेच असल्याबाबत आमची खात्री झाल्याने पोहेको / ए पी इनामदार यांनी पशु वैद्यकिय अधिकारी यांना फोन करुन त्यांना सदर ठिकाणी छाप्याची माहिती देवुन सदर ठिकाणी मिळुन आलेल्या मांसाचे सॅम्पल घेवुन जाणे कामी कळविले. मिळुन आलेल्या मांसातुन 200 ग्रॅम मांस सॅम्पल म्हणुन बाजुला काढुन त्यावर पंचांचे व वैद्यकिय अधिकारी यांचे सह्यांचे लेबल लावले. सदर रठिकाणी मिळुन आलेल्या गोवंशीय मांसाचे तसेच चाकु व पुढील प्रमाणे- सत्तुरचे वर्णन
1) 6,60,000/- रु.किं. चे गोवंशीय जातीचे जनावरांचे मांस त्यामध्ये हड्डी, मांस ही, मांस असे लहान, मोठे आकाराचे मांसाचे तुकड अंदाजे 2200 किलो प्रति किलो 300/- रु. किलो प्रमाणे 2) 00,00/- किंमतीचा एक लोखंडी तराजु, एक 1 किलो ग्रॅम वजनाचे लोखंडाचे माप, सत्तुर जु.वा. किंअं. 6,60,000/- एकूण येणे प्रमाणे वरील वर्णनाचे गोवंशीय जातीचे मांस त्यामध्ये हड्डी, मांस असे लहान, मोठे आकाराचे मांसाचे तुकड़े इसम नामे -अब्दुल हक फकीर मोहंमद कुरेशी उर्फ (काका) वय-52 वर्ष रा. कुरेशी मोहल्ला, आर. आर बेकरी समोर झेंडीगेट व 2) नफिस कुरेशी वय 27 वर्षे रा सदर यांचे ताब्यात मिळुन आल्याने पोहेकॉ ए पी इनामदार यांनी सत्तुर, वजनकाटा असे ताब्यात घेतले.

तरी दि. 08/12/2024 रोजी रात्री 23/10 वा.चे सुमा. कुरेशी मज्जिद शेजारी, आर आर बेकरी समोर बेपारी मोहल्ला झेंडीगेट जि.अ. नगर येथे इसम नामे अब्दुल हक फकीर मोहंमद कुरेशी उर्फ (काका) वय -52 वर्ष रा. कुरेशी मोहल्ला, आर. आर बेकरी समोर झेंडीगेट, जि. हिल्यानगर व 2) नफिस कुरेशी वय 27 वर्ष रा सदर यांनी महाराष्ट्र राज्यात गोवंशीय जनावरांच्या हत्येस बंदी असताना आपल्या कब्जात 4,40,000/- रुपये किंमतीचे गोवंशीय जातीचे जनावरांचे मांस व विक्रीसाठी लागनारे साहित्य आपल्या कब्जात बाळगुन सार्वजनिक ठिकाणी लोकांचे आरोग्यास धोका निर्माण होईल अशा रितीने कब्जात बाळगुन गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले मास विक्री करताना मिळून आला. कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सुरज दिलीप कदम यांनी त्यांचे विरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 वे कलम 271 सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1976 चे कलम 5 (क) 9 (अ) अन्वये फिर्याद आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे