Breaking
ब्रेकिंग

महसूल मंडळाचे १५ रोजी समाधान शिबीर

0 3 9 0 6 1

*महसूल मंडळाचे १५ रोजी समाधान शिबीर*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंनतर्गत १५ मे रोजी इंदिरा भुवन मंगल कार्यालयात सकाळी १० ते ४ दरम्यान जनतेच्या समस्या निराकरण व तक्रारी निवारण करण्यात येणार आहेत.अमळनेर मंडळातील अमळनेर ,मंगरूळ , अंतुर्ली , धार ,रंजाणे व मालपूर या गावांमधील सर्वसामान्य जनता , शेतकरी ,महिला , विद्यार्थी यांच्या दैनंदिन समस्या , प्रश्नांचे निराकरण करणे व निकालात काढण्यासाठी , प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम ,गतिमान करण्यासाठी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या भागातील नागरिकांनी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याजवळील योग्य ती कागदपत्रे घेऊन हजर रहावे असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे