शिक्षिका ते प्राचार्या या प्रवासात त्यांनी हजारो विद्यार्थिनींच्या जीवनात शिक्षणाचा उजेड दिला
प्रा.गायत्री भदाणे यांचा सेवापूूर्ती सोहळा संपन्न
शिक्षिका ते प्राचार्या या प्रवासात त्यांनी हजारो विद्यार्थिनींच्या जीवनात शिक्षणाचा उजेड दिला
प्रा.गायत्री भदाणे यांचा सेवापूूर्ती सोहळा संपन्न
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- आज, 30 जून 2025 रोजी मा. सौ. गायत्री चंद्रकांत भदाणे मॅडम, प्राचार्या – सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर या आपल्या 32 वर्षांच्या तेजस्वी, कर्तृत्वशील आणि विद्यार्थीप्रिय शैक्षणिक प्रवासाची यशस्वी सांगता करत, सेवानिवृत्त होत आहेत.शिक्षिका ते प्राचार्या या प्रवासात त्यांनी हजारो विद्यार्थिनींच्या जीवनात शिक्षणाचा उजेड टाकला. गरजू आणि होतकरू विद्यार्थिनींना मुख्य प्रवाहात आणण्यामागे त्यांच्या संवेदनशीलतेची , चिकाटीची आणि शिक्षणावरील नितांत निष्ठेची साक्ष होती. त्यांचं कार्य हे “उपेक्षितांना जवळ आणणं आणि होतकरूंना उभं करणं” या ब्रीदवाक्याभोवती सतत घुटमळत राहिलं.शिक्षणाचा वारसा घरातूनच वडील प्रसिद्ध वकील आई – रा.वि.
संस्था,चाळीसगावच्या संचालिका भाऊ – नामवंत चार्टर्ड अकाउंटंट पती – मा. श्री. चंद्रकांत भदाणे, वत्साई एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन सासरे – शिक्षण विभागातील निवृत्त ADI कन्या – कु. मनस्वी, MBBS शिक्षणात प्रगतीपथावर संस्थात्मक योगदान -वत्साई एज्युकेशन सोसायटी – सचिव पर्ल इंटरनॅशनल स्कूल व ITI – सचिव साने गुरुजी माध्यमिक पतपेढी – माजी संचालक सावित्रीबाई महिला ज्येष्ठ नागरिक संघ – सचिव जळगाव जिल्हा गाईड – ADC म्हणून उल्लेखनीय कार्य सेवानिवृत्ती समारंभातील विशेष क्षण छोटेखानी व सौहार्दपूर्ण कार्यक्रमात प्रा. सुनील गरुड सर (मानद शिक्षण संचालक, नवलभाऊ प्रतिष्ठान)यांनी गायत्री मॅडम यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा भावस्पर्शी आढावा घेतला.त्यांनी मॅडम यांना पुढील जीवनात सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, अशा मंगल शुभेच्छा दिल्या.
यावेळी आबासाहेब डी. बी. पाटील – प्रशासकीय अधिकारीप्रा. श्याम पवार सर – प्रशासकीय प्रधिकारी आबासाहेब शामकांत भदाणे – ग.स. पतपेढीचे माजी उपाध्यक्ष प्रा. चंद्रकांत भदाणे – चेअरमन, वत्साई एज्युकेशन एस. डी. देशमुख सर – निवृत्त मुख्याध्यापक अनिता बोरसे मॅडम – मुख्याध्यापिका प्रकाश पाटील सर – मुख्याध्यापक गोसावी सर – माजी मुख्याध्यापक सुनील पाटील सर – मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा माळशेवगा उमेश काटे सर – तालुकाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया शिक्षकवृंद, नॉन-टीचिंग स्टाफ, सहकारी शिक्षक, हितचिंतक व विद्यार्थिनी उपस्थित होते .


