Breaking
ब्रेकिंग

तिरळेपणा व पडलेल्या पापणीच्या आजारांसाठी आयोजित मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0 7 6 9 4 2

तिरळेपणा व पडलेल्या पापणीच्या आजारांसाठी आयोजित मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव जिल्हा:- प्रतिनिधी पंकज

जळगाव : तिरळेपणा व पडलेल्या पापणीच्या
आजारांसाठी आयोजित मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, पुणे येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांच्या नेतृत्वाखालील २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आज जळगावात दाखल होत आहे.
        जळगाव खुर्द येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दि. १ व २ एप्रिल रोजी पार पडलेल्या तपासणी शिबिरात सुमारे १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७५ रुग्णांवर दि. ५ एप्रिलपर्यंत डॉ. झंवर स्वतः शस्त्रक्रिया करणार आहेत, तर उर्वरित रुग्णांना पुढील उपचाराबाबत सल्ला देण्यात आला आहे.
तिरळेपणा या डोळ्यांच्या आजारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज आता उरलेली नाही. जळगावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.
डॉ. मधुसूदन झंवर यांना तिरळेपणा शस्त्रक्रियेचा तीन दशकांहून अधिक अनुभव असून त्यांनी ग्रामीण व शहरी भागात १९८ नेत्रशिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत. त्यांच्या कार्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
‘तिरळेपणा मुक्त जळगाव जिल्हा’ हा उद्देश ठेवून हे शिबिर आयोजित करण्यात आले असून जळगाव व परिसरातील रुग्णांसाठी ही मोठी संधी ठरत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे