Breaking
ब्रेकिंग

पहलगाम अतिरेकी हल्ला, शिवसेना उबाठाने पाकिस्तानी ध्वज जाळुन केला तीव्र निषेध

0 3 9 0 6 4

पहलगाम अतिरेकी हल्ला, शिवसेना उबाठाने पाकिस्तानी ध्वज जाळुन केला तीव्र निषेध

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

धुळे – जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील छोटे स्वित्झलर्ड म्हणनू ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी २२ एप्रिल दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला.दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला ने ज्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, याच्या निषेधार्थ , शिवसेना उध्दव बाळासाहबे ठाकरे पक्षाच्या वतीने क शिवतीर्थ शहिद अब्दुल हमीद स्मारक येथे कॅन्डल पेटवून शहीद झालेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली रे वाहण्यात आली. पाकिस्तान विरोधात प्रचंड का घोषणाबाजी करत जागतिक दहशतवादाचे मुख्यकेंद्र असलेल्या पाकिस्तान देशाचा ध्वज जाळण्यात येवुन निषेध करण्यात आला. जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधील मार्गाने अमरनाथ बाबा बर्फानी यांच्या यात्रेला लाखो भारतीय दरवर्षी जातात. या यात्रेचे भारतीय संसकृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा सुमारे ६२ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी १४ ‘ एप्रिलपासून ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने ‘ नोंदणी सुरू झाली आहे. या वर्षी अमरनाथ यात्रा

३ जुलै २०२५ ते ९ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार आहे. अमरनाथ यात्रा नियोजन डोळ्यासमोर ठेवून व जम्मू काश्मीर पर्यटकांना टार्गेट करण्यासाठी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे.

शिवसेना धुळे जिल्हावतीने हा निषेध करण्यात आला, याप्रसंगी शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, मा.आ.शरद पाटील, महापौर भगवान करणकाळ, नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, ललित माळी, विजय वाघ, संदीप सूर्यवंशी, निंबाजी मराठे, जवाहर पाटील, संजय पाटील, शेखर वाघ, रामदास कानकाटे डॉ. अनिल पाटील, चिलु आवळकंठे, कपील लिंगायत, महादू गवळी, आनंद जावडेकर, दिनेश पाटील, पंकज भारस्कर, सुनील चौधरी, निलेश कांजरेकर, विष्णू जावडेकर, पिनु सूर्यवंशी, अजय चौधरी, हिमांशू परदेशी, योगेश पाटील, डॉ. सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे