दोन वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा शोध व सुटका*
*दोन वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा शोध व सुटका*
*ऑपरेशन मुस्कान अंतर्गत वर्षभरात राहुरी पोलीसांनी लावला एकूण 73 मुलींचा शोध*
राहुरी तालुका जावेद शेख
राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर 876/2023 भारतीय दंड विधान कलम 363 , प्रमाणे दिनांक 11/08/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयामध्ये अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध्द नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा शोध घेऊन तीला राहुरी पोलीस स्टेशनला आणून सदर पीडितेस तिचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. व अपहरण करणारा युवक करण अशोक पवार वय 23 वर्ष रा. खुडसरगाव तालुका राहुरी यास ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव , पोकॉ. गणेश लिपने हे करत आहेत.
*ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मुलींचा शोध घेऊन गेल्या वर्षभरात 73 मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.*
सदरची कारवाई मा.श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री. सोमनाथ वाकचौरे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , श्री. डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, पोसई राजू जाधव , पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ.अशोक शिंदे पोकॉ. गणेश लिपणे पोकॉ. शेषराव कुटे , मपोकॉ. वृषाली कुसळकर, अंजली गुरवे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर व पो.ना.संतोष दरेकर, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर जि. अहिल्यानगर मोबाईल सेल यांनी केलेली आहे.



