Breaking
ब्रेकिंग

अलिबागमध्ये सापडला दुर्मिळ पिवळ्या पोटाचा समुद्रसर्प

0 7 6 9 4 3

अलिबागमध्ये सापडला दुर्मिळ पिवळ्या पोटाचा समुद्रसर्प

प्रतिनिधी: राजेश बाष्टे

अलिबाग: दि. ०१/ आज दिनांक १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:४५ च्या सुमारास एका नागरिकास एक समुद्रसर्प वाळूवर पडलेला आढळला, त्यांनी त्वरित वाइल्डलाइफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संघटनेचे सक्रिय सभासद श्री अक्षय पाटील ह्यांना संपर्क केला. घटनेची माहिती मिळताच संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद दाभोळकर आणि सक्रीय सदस्य अदिती सगर हे त्वरित घटनास्थळी पोहोचले. सापाची प्राथमिक तपासणी करून तो आजारी अथवा जखमी नसल्याची खात्री करून सदर सापाला सुरक्षितपणे पुन्हा समुद्रात सोडून दिले.

हा साप पिवळ्या पोटाचा समुद्रसर्प ( yellow bellied sea snake) म्हणून ओळखला जातो. हे समुद्रसर्प दुर्मिळ असून क्वचितच अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी सापडतात. आजारपण, इजा अथवा थकव्यामुळे हे साप भारती बरोबर समुद्रकिनाऱ्यावर येतात. हे साप आपले संपूर्ण आयुष्य समुद्रात घालवतात त्यामुळे ह्या सापांची शरीररचना जमिनीवर सरपटण्यासाठी अनुकूल नसते आणि त्याचमुळे एकदा का हे वाळूवर अडकले की पुढच्या भरतीपर्यंत ते परत समुद्रात जाऊ शकत नाहीत आणि बरेचदा यादरम्यान त्यांचा मृत्यू होतो. सर्वच समुद्रसर्प अत्यंत विषारी असून त्यांचा दंश झाल्यास प्रतिसर्पविष लस उपलब्ध नाही, त्यामुळे असे साप किनाऱ्यावर आढळून आल्यास स्वतः त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये आणि वनविभाग अथवा वाइल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संघटनेशी संपर्क साधावा असे डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी नमूद केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे