Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी 

स्वाभिमानी प्रतिष्ठान कासारमळा गुंडेगावच्या वतीने शिवनेरी गडावरून आणलेल्या ज्योतीचे स्वागत

0 8 6 6 6 5

गुंडेगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी 

स्वाभिमानी प्रतिष्ठान कासारमळा गुंडेगावच्या वतीने शिवनेरी गडावरून आणलेल्या ज्योतीचे स्वागत,

न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

गुंडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. स्वाभिमानी प्रतिष्ठान कासारमळा गुंडेगाव यांच्या वतीने ऐतिहासिक शिवनेरी किल्ला येथून पवित्र ज्योत आणण्यात आली. या ज्योतीचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य स्वागत करण्यात आले. व भगवा ध्वज फडकवण्यात आला.
गावातून ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या साक्षीने मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषणे, पोवाडे व देशभक्तीपर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
गावातील नागरिक, युवक-युवती आणि महिला मंडळांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला. शिवजयंतीनिमित्ताने गावात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे