भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही व्हॉइस रेकॉर्डिंग कॅमेरे व दरपत्रक लावा – – अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही व्हॉइस रेकॉर्डिंग कॅमेरे व दरपत्रक लावा – – अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर शहराच्या भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही , व्हॉइस रेकॉर्डिंग कॅमेरे व दरपत्रक लावावे या विषयी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेने मुख्यमंत्र्यांना ईमेल द्वारे निवेदन दिले असुन त्यांच्या ईमेल ला सकारात्मक प्रतिसादही मिळाला आहे .
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अहिल्या नगर जिल्ह्यातील भिंगार तलाठी कार्यालयात एजंट व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितसंबधातून सर्वसामान्यांची लूट होत आहे.सदर कार्यालयात भ्रष्टाचार वाढला असून, नागरिकांची लूट थांबविण्यासाठी तातडीने सदरची उपाय योजना करण्यात यावी.या विषयावरसंघटनेच्या शिष्टमंडळाने मंडळ अधिकारी यांची दिं- १७-२-२५ रोजी भेट घेऊन निवेदन देण्यात आले.परंतु अद्यापही भिंगार तलाठी कार्यालया मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे व दरपत्रक लावण्यात आले नाही.
तलाठी कार्यालयातील दररोजच्या कामकाजावर कॅमेऱ्यांची निगराणी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.सध्या या कार्यालयात उत्पन्न दाखला, जागेच्या नोंदी आणि इतर कागदपत्रांसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जात आहे.परंतु येथे दरपत्रक सुद्धा लावलेले नाही, ज्यामुळे भ्रष्टाचार वाढला आहे आणि नागरिकांची लूट होत आहे. तलाठी कार्यालयात बाहेरचे एजंट लोक कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामे करून घेत आहेत, ज्यामुळे सामान्य जनतेची पिळवणूक केली जात आहे. अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावले आहेत,परंतु भिंगार तलाठी कार्यालयात अद्याप अशी व्यवस्था का नाही ?
भिंगार तलाठी कार्यालयातील मंडळ अधिकारी,तलाठी व कर्मचारी यांची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी व भिंगार तलाठी कार्यालय मध्ये लवकरात लवकर सी.सी.टीव्ही व्हॉइस रेकॉर्डिंग कॅमेरे व दरपत्रक बसण्यात यावे अशी संघटनेच्या वतीने अध्यक्ष सनीभैय्या खरारे यांनी इतर संबंधीत विभागासह मुख्यमंत्र्यांना ईमेल द्वारे विनंती केली.
अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या विभागातून प्रतिसाद मिळाला असून
सदर ई-मेल योग्य त्या कार्यवाहीसाठी प्रधान सचिव, महसूल विभागाकडे पाठविण्यात आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे .