Breaking
ब्रेकिंग

घातक शास्त्रांनिशी जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद*

0 7 6 9 4 7

*घातक शास्त्रांनिशी जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद*

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देवळाली प्रवरा येथील शेतकरी शंकर नारायण देशमुख यांच्या वाड्यातील दोन बकऱ्या घातक शास्त्रानिशी दरोड्याच्या तयारीने येऊन चोरांनी आणलेल्या कार गाडीत सदर बकऱ्या चोरून नेल्याबाबत भारतीय न्याय संहिता कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर चोरलेल्या बकऱ्या घेऊन जात असताना फॅक्टरी येथे काही नागरिकांनी सदर चोरांना पकडले व राहुरी पोलीस स्टेशनची संपर्क साधला.
त्यावेळी अशी लक्षात आले की देवळाली प्रवारा येथील चोरलेल्या बकऱ्याचे सदर चोर घेऊन जात होते.
त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना फोन केला. दरम्यानच्या काळात चोरी करणारे 04 इसम सैरभैरहून पळून गेलेले होते.
ताब्यात घेतलेला इसमनामे सनी उर्फ कृष्णा मुकेश सूर्यवंशी यास राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान उर्वरित आरोपी विशाल उर्फ पिण्या विष्णू बर्डे राहणार वाळूंज वस्ती, देवळाली प्रवरा, दादा राजू बर्डे राहणार देवळाली प्रवरा अनिल दत्तू पवार राहणार देवळाली प्रवरा अशा चौघांना राहुरी पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव व लेखनिक पोकॉ. गणेश लिपणे यांनी अटक करून त्यांना मा. न्यायालयापुढे पोलिस कस्टडी मिळणे कामी हजर करून सरकारी अभियोक्ता श्री पाटील यांनी बाजू मांडल्याने अटक चारही आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री देवदत्त पवार साहेब, यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके, राहुल यादव, सुरज गायकवाड, विजय नवले,पोना. प्रवीण बागुल,पोकॉ. गणेश लिपने, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजने, अंकुश भोसले, अंबादास गीते यांच्या पथकाने केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे