रंगपंचमी,गुढीपाडवा आणि रमजान ईद सणाच्या तोंडावरच होमगार्डचे भत्ते खात्यात जमा झाल्याने होमगार्ड जवानांमध्ये जल्लोषाचे वातावरण….
साधारणतः सोलापुर जिल्ह्यातील 1047 होमगार्डचे 02 कोटी 51 लाखाहुन अधिक रक्कम जमा..
रंगपंचमी,गुढीपाडवा आणि रमजान ईद सणाच्या तोंडावरच होमगार्डचे भत्ते खात्यात जमा झाल्याने होमगार्ड जवानांमध्ये जल्लोषाचे वातावरण….
साधारणतः सोलापुर जिल्ह्यातील 1047 होमगार्डचे 02 कोटी 51 लाखाहुन अधिक रक्कम जमा..
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
करमाळा (प्रतिनिधी) : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षा निर्भय व सुरक्षीत वातावरणात शांततेत पार पडाव्यात यासाठी प्रत्येक वर्षी बारावी व दहावीच्या परिक्षेकरिता होमगार्डचा बंदोबस्त तैनात केला जातो. हा बंदोबस्त एक महिनाहुन अधिक दिवसाचा असल्याने एकाचवेळी सर्वच होमगार्ड जवानांना न घेता दोन टप्प्यात हा बंदोबस्त देण्यात येतो.जेणेकरून सर्व होमगार्डना समप्रमाणात बंदोबस्त मिळावा हा हेतु असतो. मात्र आणखीन दुसर्या टप्प्यातील बंदोबस्त सुरू असतानाच पहिल्या टप्प्यातील बंदोबस्तचे भत्ते जिल्हा होमगार्ड कार्यालयाकडून होमगार्डच्या बॅक खात्यात जमा झाल्याने होमगार्ड जवानांकडून कमालीचा आनंद व्यक्त करण्यात येत असून,होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनखाली जिल्हा प्रशासकीय अधिकारी,केंद्रनायक,लिपीक यांच्या या कामगीरीचे होमगार्ड जवानांकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
होमगार्डच्या आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या लवकर होमगार्ड जवानांना भत्ते मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असल्याचे होमगार्ड जवानांकडून बोलले जात आहे. त्याचबरोबर होमगार्ड जवानांना लवकर त्यांचे भत्ते मिळवुन देण्यासाठी त्या त्या ठिकाणचे पर्यवेक्षक अधिकारी व लिपिक यांनी संपुर्ण आवश्यक कागदपत्रे जिल्हा कार्यालयात सादर केली व तातडिने जिल्हा कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी अमित माळी,केंद्रनायक एकनाथ सुतार आणि लिपिक सुनिल चव्हाण यांनी जिल्हा समादेशक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनखाली होमगार्ड जवानांना सणासुदीच्या तोंडावर उत्साह व आनंद द्विगुणित करण्यासाठी आपली यंत्रणा व आवश्यक ते कागदपत्र तयार करून बिले बॅकेत जमा केली. त्याचा प्रचंड प्रमाणात होमगार्ड जवानांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच माघवारी बंदोबस्त यात्रा पंढरपुर व साप्ताहिक कवायत बिले हेदेखील होमगार्ड जवानांच्या खात्यात जमा केलेली आहेत. साधरणतः 1047 होमगार्ड परिक्षा बंदोबस्त करिता हजर होते त्यांचे 2 कोटी 51 लाख रूपये आणि माघवारी बंदोबस्तचे 34 लाख रूपये असे एकुण 2 कोटी 85 लाख रूपये बॅकेत जमा केले आहेत. याकामी आम्हाला होमगार्ड मुख्यालय मुंबई व शासनाकडून लवकर निधी उपलब्ध झाल्याने हे शक्य झाले असुन, लगेचच परिक्षा भाग दोन टप्पा हे देखील लवकरात लवकर बॅकेत जमा करण्याचे आमचे नियोजन असल्याचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी सांगितले आहे.