भडगाव रोडवरील हॉटेल मनसुख येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

भडगाव रोडवरील हॉटेल मनसुख येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- जळगाव जिल्हयातील चाळीसगाव ला 22 एप्रिल 2025 रोजी पहाटे 03.00 भडगाव रोडवरील हॉटेल मनसुख येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागण्याची घटना घडली. आगीच्या दरम्यान हॉटेलमध्ये असलेल्या जनरेटर च्या कॉम्प्रेसर चा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली होती.घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी धाडसाने ६ ते ७ जणांना सुरक्षितपणे आगीमधून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.या दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार देऊन घरी विश्रांतीसाठी पाठवण्यात आले आहे. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे.अग्निशमन दलाच्या मदतीने आग पूर्णतः नियंत्रणात आणण्यात आली असून अधिकृत तपास सुरु आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संबंधित माहिती तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहे.या घटनेत पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान व धाडस प्रशंसनीय असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सदैव तत्पर आहे. – -किरणकुमार कबाडी
पोलीस निरीक्षक
चाळीसगाव शहर पोलीस ठाणे