भावी पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्टया सुदृढ असावी : डॉ. उद्धव शिंदे
स्नेहबंध' व साई डेंटल तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत दंतचिकित्सा शिबीर ...

भावी पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्टया सुदृढ असावी : डॉ. उद्धव शिंदे
‘स्नेहबंध’ व साई डेंटल तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत दंतचिकित्सा शिबीर …
एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क
अहिल्यानगर | आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक आणि आधारस्तंभ आहेत. देशाची ही भावी पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्टया अधिक सुदृढ असायला हवी, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
स्नेहबंध सोशल फाउंडेशन व साई डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडी येथील अपंग संजीवन सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वसतिगृह येथे मोफत दंतचिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी डॉ. शिंदे बोलत होते. याप्रसंगी विद्यालयाच्या संचालिका सौ. विद्या भावले, मुख्याध्यापक डि के जगधने, अवंतिका जाधव आयुष लालबोन्द्रे आदी उपस्थित होते. डॉ. अतुल मडावी यांनी या विद्यालयातील ९७ विद्यार्थ्यांची दातांची तपासणी केली.
शारीरिक आरोग्याप्रमाणे मौखिक आरोग्यही गरजेचे…
साई डेंटल क्लीनिकचे डॉ. अतुल मडावी म्हणाले, समाजातील काहीशा दुर्लक्षित असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य वैद्यकीय सेवा मिळायला हव्यात. विद्यार्थ्यांसाठी शारीरिक आरोग्याप्रमाणे मौखिक आरोग्य हे देखील गरजेचे आहे. त्यासाठी या दंत तपासणी शिबीराचे आयोजन केले.