Breaking
ब्रेकिंग

छावा या चित्रपटाला करमणुक कर माफ करा – उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप पदाधिका-चे पत्राद्वारे मागणी

0 3 9 0 2 0

छावा या चित्रपटाला करमणुक कर माफ करा – उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप पदाधिका-चे पत्राद्वारे मागणी

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- नुकताच विविध प्रमाणित ऐतिहासिक संदर्भाचा आधार घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुर पराक्रमावर आधारित जीवनपट चित्रपटाच्या रूपात सादर करण्यात आला आहे. सदर चित्रपटाच्या माध्यमातून तत्कालीन परकिय आक्रमणाच्या परिस्थिती चे चित्रण करून आजच्या पिढीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची कारकिर्द दाखविण्याचा प्रामाणिक व उत्कृष्ट प्रयत्न चित्रपटाच्या निर्मात्यांनी केलेला आहे. आजच्या स्थितीला ग्रामीण भागातील सिंगल स्क्रीन चित्रपट गृह नामशेष झाले असून मल्टी स्क्रीन चित्रपट गृहातील भाडे अधिक असते. मागील सरकारच्या सत्ताकाळात ऐतिहासिक संदर्भजोडून तयार करण्यात आलेल्या ऐतिहासिक चित्रपटांना करमणूक कर माफ करण्यात आला होता. तरी सदर चित्रपटाला शासनाकडून करमणूक कर माफ करण्यात यांवा जेणेकरून अधिक लोकांना चित्रपटाचा आनंद घेता येईल तसेच जनमानसात राष्ट्रवादाची भावना बळकट होण्यास मदत होईल असे विजय पंडित राजपुत शहर अध्यक्ष भाजपा, अमळनेर, मा. शहराध्यक्ष उमेश कोल्हे, शितल देशमुख विधानसभा क्षेत्र प्रमुख , शहराध्यक्ष देवा लांडगे, सरचिटणीस भाजप युवा मोर्चा समाधान पाटील, विनय बारी शिवकिरण बोरसे यांनी पत्राद्वारे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे