Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी  प्रमोद पाटील यांची नियुक्ती

0 3 9 0 2 0

महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी  प्रमोद पाटील यांची नियुक्ती

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव :- राज्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस कार्य करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा याकरिता व या कार्यात अधिकाधिक भर पडावी यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नियुक्त्या देण्यात येत आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत दिसून येत आहे प्रत्यक्ष क्षेत्रात शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होताना दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून तो अडचणीत आला आहे अवकाळी पावसामुळे व प्रशासनच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मुळचे प्रगणे डांगरी ता अमळनेर चे प्रमोद रमेश पाटील हल्ली मुक्काम देवपूर धुळे येथे वास्तव्य करत असून त्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळींमध्ये विशेष कार्य केलेले असून ते अर्धवेळ प्राध्यापक आहेत.ज्ञानदान करत असताना शेतकऱ्यांनाही संघटित केलं पाहिजे हा दृष्टिकोनातून यांची धुळे जिल्हाध्यक्ष पदी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी आज रोजी  नियुक्ती पत्राद्वारे केली.
   आपण एक शेतकरी पुत्र असून आपण शेती व  शेतकऱ्यांच्या हितासाठी परिसरातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे कामी काम करण्यासाठी धुळे जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात येत असल्याचा उल्लेख असून संघटनेला मजबूत करण्यासाठी संघटनेचे ध्येय धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग यांच्यापर्यंत पोहचून शेतकरी हीत जपणार  अशी अपेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी व्यक्त करून पुढील कार्यकारणी पंधरा दिवसाच्या आत घोषित करून संघटनेच्या कार्यालयात पाठवावी असे नमूद केलेले आहे तसेच ज्यांना ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेत सामील होऊन शेतकऱ्यांसाठी कार्य करायचे असेल अशांनी 9890875238 या नंबरवर संपर्क करावा असे सांगितले.
   श्री प्रमोद पाटील यांची धुळे जिल्ह्यातील संघटनेचे सर्व कार्यकर्ते सदस्य यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे