राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना इलेक्शन अनुषंगाने रॉंग साईड वाहन चालवणाऱ्या सुमारे 19 वाहन चालक यांना राहुरी पोलिसांनी रॉंग साईड चालकावर केला दंड
राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना इलेक्शन अनुषंगाने रॉंग साईड वाहन चालवणाऱ्या सुमारे 19 वाहन चालक यांना राहुरी पोलिसांनी रॉंग साईड चालकावर केला दंड
राहुरी / विशेष प्रतिनिधी : जावेद शेख
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत राहुरी फॅक्टरी येथे वारंवार ट्राफिक जाम होत असून सदर जामचे मूळ कारण हे बरेचसे वाहन चालक हे थोडेही ट्राफिक जाम असल्यास फुटलेल्या रोड डिव्हायडर मधून रॉंग साईडने गाड्या टाकतात व त्यामुळे तासंतास वाहतुकीचा खोळंबा होतो.
दिनांक 31/05/2025 रोजी राहुरी फॅक्टरी कारखाना येथे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना चे वोटिंग असल्याने पब्लिकने रॉंग साईड गाड्या टाकल्याने ट्राफिक जाम झाल्याने एकूण 19 वाहनांनी रॉंग साईट धोकादायक पद्धतीने गाड्या घातल्या ज्यामुळे अधिकच ट्राफिक जाम झाल्याने सुमारे 19 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 15,000/- हजार रुपये दंड वसूल केला. वाहन क्रमांक MH 17 AZ 7517 या वाहनातील भाविकांना उतरवून घेऊन त्यांना दुसऱ्या वाहनाने देवदर्शनाकरता रवाना केले नमूद वाहनावर 66(1)/192 मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना आव्हान केले की कोणीही रॉंग साईड गाडी टाकून वाहतूक जाम करू नये.
तसेच वाहतूक जाम टाळण्यासाठी अशा प्रकारची कारवाई नियमित राहुरी फॅक्टरी तथा राहुरी शहरात केले जाणार असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली.
सदरची कारवाई पोलीस हवालदार संतोष ठोंबरे, पोलीस हवालदार फुलमाळी, चालक शकूर सय्यद,सचिन ताजणे , प्रमोद ढाकणे ,अंकुश भोसले यांच्या पथकाने केली.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुवर्मे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात करण्यात आली.



