रविराज हायटेक कडून पूरग्रस्तांसाठी चादरींचे वाटप:- प्रशासनाच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद
रविराज हायटेक कडून पूरग्रस्तांसाठी चादरींचे वाटप:- प्रशासनाच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. ०९/ करमाळा तालुक्यातील सीना नदीच्या महापुरात नदी काठच्या हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. त्यांच्या घरा-दारांमध्ये पाणी शिरल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य वस्तू वाहून गेले आहेत. तसेच त्याचे प्रचंड नुकसानही झालेले आहे. यासाठी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मदतीचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देताना अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. यामध्ये रविराज हायटेक प्रायव्हेट लिमिटेड, पोफळज कंपनीचे संचालक राजेंद्र लक्ष्मण पवार यांनी प्रत्येक कुटुंबाला मिळेल असे चादर – सतरंजीचे वाटप केले आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे हे चादर- सतरंजी देण्यात आले असून तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी रविराज कंपनीचे प्रशांत शिंदे, सुशांत पवार, अहमद कुरेशी, सचिन नलावडे, जयपाल खराडे, सुधीर साठम, धनंजय शहाणे, नायब तहसीलदार सादिक काझी, मंडल निरीक्षक युसूफ बागवान, अशपाक सय्यद, मुस्तकीम पठाण, कलीम शेख, इम्तियाज पठाण, रमजान सय्यद, इक्बाल शेख, निशांत खारगे, संतोष पोद्दार, विशाल पोळ, कुणाल गावडे, राजेंद्र पोळ, बाळु पवार आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी सर्व चादर-सतरंजी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून, अजून मदत देणार असल्याचे राजेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्वांचे आभार अहमद कुरेशी यांनी मानले.



