Breaking
ब्रेकिंग

करमाळा तालुक्यात कागदोपत्री विकासाविरुद्ध संतापाची लाट; “मामाच्या काळातला कागदावरचा विकास वीट गावात दिसतोय बर का”

0 4 0 4 1 0

करमाळा तालुक्यात कागदोपत्री विकासाविरुद्ध संतापाची लाट; “मामाच्या काळातला कागदावरचा विकास वीट गावात दिसतोय बर का”

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २३/ पाच महिन्यात पाच पैशाचाही निधी न आणू शकलेल्या विद्यमान आमदार नारायण पाटलांनी आता यापूर्वीचे आमदारांनी कागदोपत्री विकास कसा केला याबद्दल बोलत बसण्यापेक्षा पाच महिन्यात आपण किती निधी आणला याचा हिशोब जनतेला द्यावा आणि विकासाच्या राजकारणावरती बोलावे. पाच महिन्यात पाच एसटी बस आणल्या त्याचं कौतुक किती सांगता ? त्यासाठी पाच नेत्यांची पत्र आणि पाच पत्रकारांचा पाठपुरावा सुरू होता. त्यात नेमके तुमचे योगदान किती ? असे प्रश्न उपस्थित करतानाच माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे राजकीय अस्तित्व करमाळा तालुक्यात उरले किंवा ना उरले याचा आणि मतदारसंघाच्या विकासाचा काय संबंध ? असे संतप्त प्रश्न गावागावात आणि सोशल मीडियात उपस्थित करतानाच आमदार साहेब आपण भविष्यकाळात काय आणि कशाप्रकारे विकास करणार आहात ? आदिनाथ कारखाना कसा सुरू करणार आहोत? याविषयी भाष्य करणे सोयीस्कर ठरेल असे सल्लेही विद्यमान आमदार नारायण पाटील यांना गावागावातून दिले जात आहेत.

शिंदे यांच्या कागदोपत्री विकासाची अवहेलना करून आपण विधानसभा व कारखाना ही पदरात पाडून घेतला. तोच विषय आपण अजून किती निवडणुकांमध्ये उचलणार आहात ? आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे ते मतदार संघाच्या भरीव विकासासाठी याबद्दल आपण काही बोलणार आहात की नाही ? असा प्रश्न करून वीट येथील ग्रामस्थांनी “मामाच्या काळातला कागदावरचा विकास वीट गावात दिसतोय बर का” ह्या टॅगलाईन खाली गावात भले मोठे फ्लेक्स लावून यापूर्वी झालेली विकास फोटोसह दाखवला आहे. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. यात्रेनिमित्त वीट येथे लावलेले हे फ्लेक्स यात्रेकरूंचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच आता तालुक्यातील इतर गावांचेही लक्ष या फ्लेक्सने वेधून घेतले आहे. वीट येथील या व्हिडिओ नंतर आता गावागावातून यापूर्वी झालेल्या विकास दाखविण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत व त्याचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडिया वरती व्हायरल करत आहेत.

चौकट:-
विद्यमान आमदारांनी दहिगाव योजनेचे बंद नलिकेचे सुरू असलेले काम बंद पाडले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी टक्केवारीसाठी पाईप जाळले हे सगळे जगजाहीर आहे. दहिगाव योजनेसाठी तब्बल 116 कोटी निधी मामांनी मंजूर केला असून त्याचे सुरू असलेले काम बंद पाडण्याचे पाप ज्यांनी केले तेच अजून कागदोपत्री विकास म्हणून हिणवत असतील तर यासारखी संताप जनक बाब दुसरी असू शकत नाही.
*रवींद्र वळेकर:- सरपंच निंभोरे*

55 कोटीचा डिकसळ पूल, 395 कोटीचा कुगाव शिरसोडी पुल, 271 कोटींचा हॅम अंतर्गत सावडी ते वेणेगाव रस्ता, 43 कोटींची उपजिल्हा रुग्णालयाची इमारत, आवाटी, राजुरी, रावगाव येथे सुरू असलेली नवीन सबस्टेशन ची कामे, तालुक्यातील सर्व गावात संजयमामा शिंदे यांच्या अर्थसंकल्पीय निधीमधून मंजूर असलेली हजारो कोटींची कामे सध्या वेगात सुरू आहेत, परंतु विरोधकांना दृष्टीदोष असल्यामुळे ती दिसत नाहीत, परंतु मतदारांना आता ती दिसत आहेत.
*अ़ॅड.अजित विघ्ने:- प्रवक्ते शिंदे गट*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे