लोकार्पण करण्याचा उतावीळपणा करणाऱ्याचे कोणतेही योगदान नाही आयत्या बिळावर नागोबा बनण्याची त्यांची परंपरा :- श्याम पाटील
माजी नगरसेवक श्याम पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ते पुन्हा झाकून टाकले

लोकार्पण करण्याचा उतावीळपणा करणाऱ्याचे कोणतेही योगदान नाही आयत्या बिळावर नागोबा बनण्याची त्यांची परंपरा :- श्याम पाटील
माजी नगरसेवक श्याम पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ते पुन्हा झाकून टाकले
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव:-अमळनेर शहरातील क्रांतीपर्व स्मारकाचे लोकार्पण करण्याचा उतावीळपणा करणाऱ्याचे कोणतेही योगदान नाही आयत्या बिळावर नागोबा बनण्याची त्यांची परंपरा आहे. या असंस्कृतपणा व विकृतपणाचा आम्ही निषेध करतो असे परखड वक्तव्य माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली झाकोळलेले स्मारक खुले करण्यात आल्यानन्तर खळबळ माजली. माजी नगरसेवक श्याम पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ते पुन्हा झाकून टाकले. ढेकू रोडवरील फोर्टस कार्यालयात याबाबत पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. श्याम पाटील म्हणाले की नगरपालिकेच्या वास्तू सांभाळण्याची जबाबदारी मी घेतो कोणासारखे नगरपालिकेच्या वास्तूंवर पैसे कमवत नाही. अद्याप स्मारकाचे काम अपूर्ण असून ठेकेदाराचे बिलही बाकी आहे. स्मारकाचे उदघाटन क्रांतिकारकांच्या तोलामोलात दमदार केले जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रा डॉ लीलाधर पाटील म्हणाले की लीलाताई आणि डॉ उत्तमराव पाटील यांचे स्मारक व्हावे याबाबत मराठा सेवा संघाने ठराव करून श्याम पाटलांनी जागा सुचवून पालिकेमार्फत हे स्मारक उभारले. मात्र काम अपूर्ण आहे. प्रत्येक शिल्पाखाली क्यू आर कोड असेल त्याला स्कॅन करून सर्व घटनेचा इतिहास व व्हिडीओ पाहता येतील. डॉ उत्तमराव पाटील आणि लीलाताई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पदयात्रा काढायला का सुचले नाही आताच काही लोकांना काय पुळका आला. लोकार्पण करताना कोणाची लायकी काढू नये प्रत्येकाच्या कपाटात प्रत्येकाचे सांगाडे असतात. असे उदघाटन करणे चुकीचे आहे. मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड याचा निषेध करत आहे. याबाबत प्रा डॉ विलास पाटील म्हणाले की अमळनेर ही क्रांती भूमी आहे. वास्तू साकारण्यासाठी श्याम पाटील पुढे आले. मराठा सेवा संघाच्या संकल्पनेतून निर्माण केलेले स्मारक आहे. काही गोष्टींची पूर्तता बाकी आहे. उतावीळ पणा न करता प्रोटोकॉल पाळले गेले पाहिजेत. डिजिटलायझेशन झाल्यावर लोकार्पण केले जाईल. हे स्मारक वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या ५० लाख आणि अमळनेर पालिकेचे २१ लाख रुपये अशा ७१ लाखांच्या निधीतून उभारले जात आहे. पालिकेकडे १२ लाख रुपये थकबाकी आहे. अद्याप डिजीटलायझेशन व फिनिशिंग बाकी आहे.-राजन बाविस्कर ठेकेदार.