Breaking
ब्रेकिंग

सेवानिवृत संघटनेने विविध मागण्यांसाठी मंत्रालयात दिले निवेदन

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सेवानिवृत्तांच्या अडचणींचा विचार करावा - - मधुकर जंगम

0 3 9 1 1 5

सेवानिवृत संघटनेने विविध मागण्यांसाठी मंत्रालयात दिले निवेदन

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सेवानिवृत्तांच्या अडचणींचा विचार करावा – – मधुकर जंगम

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव :-महाराष्ट्र राज्य सेवानिवृत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी या संघटनेने राज्यातील सर्व स्तरावरील सेवानिवृत यांची दरमहा 5 तारखेच्या आत पेन्शन करणे,पेन्शन विक्री, ग्रॅज्युएटी, अजूनही काही जणांचे राहिलेले 7 वा वेतन आयोग हप्ते, मेडिकल बीले, इतर वेतन फरक बीले याचा निधी शिक्षण आयुक्त पुणे यांचेकडे उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे.सदरचे निवेदन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षण व ग्रामविकास सचिव यांचे कार्यालयात दिले आहे.यावेळी शिक्षणमंत्रालय, ग्रामविकास मंत्रालयातील संबंधिताशी चर्चा करण्यात आली.सदरची रक्कम मिळेपर्यंत पाठपुरावा सुरुच राहिल. सेवानिवृत यांच्या मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा करणारी राज्यातील एकमेव संघटना हीच आहे. त्यामुळेच सेवानिवृत यांच्या रकमा सतत मिळत आहेत.सर्व कामे वेळेत व्हावीत व तुमचाही खारीचा वाटा असावा म्हणून आपण या संघटनेचे सभासद होवून संघटनेस ताकद व बळ द्यावे.यावेळी राज्यअध्यक्ष मधुकर जंगम, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण दावणकर,गोंदिया जिल्हा संघटक हिवराज परशुरामकर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे