*श्री कमला भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी भक्तांकडून देणगी अर्पण*

*श्री कमला भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी भक्तांकडून देणगी अर्पण*
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. करमाळा येथील श्री कमलादेवी मंदिर जीर्णोद्धारासाठी बुधवार दि. १४/५/२०२५ रोजी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या भक्तांकडून देणगी प्राप्त झाली. देणगीदारांची नावे खालील प्रमाणे.
१) सौ. आदिती प्रणित तुंग रा. सोलापूर. यांच्या कडून ऑनलाइन देणगी रु. १०१६/
२) चि. अक्षता श्रीकांत पुराणिक. रा. सोलापूर यांच्या कडून ऑनलाइन देणगी ₹. १०१६/
३) दिग्विजय शेखर सूर्यवंशी रा. अपसिंगे मिल्टी सातारा. ऑनलाइन देणगी रु. ११००/
४) पुष्पा भालचंद्र पोफळे रा. पुणे रोख रु. १०००/
५)सौ. अर्चना वामन मुळ्ये रा. इचलकरंजी यांचे कडूनऑन लाईन देणगी रु. १०१६/
६) सौ. तृप्ती रोहित व्यवहारे रा. पुणे रोख देणगी रु. २,११६/ प्राप्त झाली. तसेच गुरुवार दि. १५/०५/२०२५ रोजी श्री नितीन भोगे रा .
श्री देवीचा माळ यांचे कडून रोख देणगी रु. १५००/ प्राप्त झाली.
मंदिर समिती तर्फे या निमित्त श्री कमला देवी मंदिर समिती कडून मंदिर समितीचे अनिल पाटील सचिव, डॉ. रोहन पाटील विश्वस्त, अशोक गाठे व्यवस्थापक, सुशील पुराणिक, रोहित पुजारी, सहदेव सोरटे, रमेश येळवणे यांच्या हस्ते सर्व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुजारी, भक्तगण, श्रीदेवीचा माळ ग्रामस्थ इं. उपस्थित होते.
श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.
श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आलेले आहे. तसेच ऑनलाईन देणगीची सुविधाही उपलब्ध आहे.
देणगीसाठी संपर्क:- अशोक गाठे व्यवस्थापक. मो. नं. ९४०४७०८९२४ / ९५७९९६१७७४.