अमळनेर तालुक्यातील पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थी वासुदेव भिमसिंग पावरा राज्यात प्रथम
अमळनेर तालुक्यातील पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थी वासुदेव भिमसिंग पावरा राज्यात प्रथम
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर : आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळा यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 2 जाने.ते ४ जानेवारी या कालावधीत नागपूर येथे पार पडल्या .या स्पर्धांमध्ये अमळनेर तालुक्यातील पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थी वासुदेव भिमसिंग पावरा याने वैयक्तिक क्रीडा प्रकारात १७ वर्षे वयोगटात १०० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक सह सुवर्णपदक मिळवले.या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक स्वप्निल पाटील, दीपक नांद्रे,सचिन पाटील अपरआयुक्त संदीप गोलाईत , प्रकल्प अधिकारी (यावल) अरुण पवार (सहाय्यक प्रकल्प अधिकारी) , संस्थेच्या अध्यक्षा विद्या पाटील व सचिव युवराज पाटील ,मुख्याध्यापक प्राथमिक माध्यमिक ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.