Breaking
ब्रेकिंग

संजय मामा शिंदे विद्यालयाच्या विद्यार्थी प्रतीक कांबळे एज्युटेक जिल्हास्तरीय जनरल नॉलेज स्पर्धेत प्रथम

0 7 6 9 4 7

 संजय मामा शिंदे विद्यालयाच्या विद्यार्थी प्रतीक कांबळे एज्युटेक जिल्हास्तरीय जनरल नॉलेज स्पर्धेत प्रथम

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

कुर्डूवाडी: दि. १५/ कुर्डूवाडी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ संचलित संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेला चि. प्रतीक प्रवीण कांबळे याने एज्युटेक शैक्षणिक उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जनरल नॉलेज जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये यश मिळवत 150 पैकी 140 मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचा सन्मान एज्युटेक चे पदाधिकारी दत्तात्रेय पराडे सर, प्रवीण कांबळे, वैद्य सर, अब्बास मुल्ला, यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन भूषण हॉल कुर्डूवाडी येथे करण्यात आला.

यावेळी माढा तालुक्यातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार टोणपे, संस्थेचे सचिव रोहन टोणपे, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. रोहित टोणपे, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे