Breaking
ब्रेकिंग

जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास :पुलांची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी

0 8 9 8 6 6

जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास :पुलांची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी

वाळकी /  प्रतिनिधी : दादा आगळे

अहिल्यानगर तालुक्यातील वाळकीसह परिसरातील कामरगाव, भोरवाडी अकोळनेर, सारोळा कासार, अस्तगाव, पिंपळगाव कौडा, खडकीआदी गावात सोमवारी (दि.१५ )सप्टेंबर पहाटेपासून झालेल्या जोरदार पावसामुळे वालुबां नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीवरील पुल, लेंडी ओढ्या वरील पुल पाण्याखाली गेल्यामुळे सोमवारचा आठवडे बाजार असल्याने भाजीविक्रेते, व्यापारी, ग्राहक यांचे मोठे हाल झाले.जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढत त्यांना प्रवास करावा लागत होता. राळेगण, गुुंडेगाव, वडगाव तांदळी, राळेगणम्हसोबा, देऊळगावसिध्दी, येथीलही अनेक प्रवाशी काही काळ अडकून पडले होते. वालुंबा नदीवरील, लेंडी ओढयावरल दोन्हीही पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वालुंबा नदीला मागे मंगळवार (दि.२७) मे रोजी पहिल्याच पावसात महापूर आला होता.यामध्ये गाळेधारकांचे,व्यवसायिकांचे, शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाची नुसकान झाले होते. त्यावेळसही पुलाला मोठे भगदाड पडले होते.तात्पुरती पुलाची मलम पट्टी करून वाहतूक सुरू करण्यात आली होती.आताही ह्या पावसात पुलाला मोठे भगदाड पडले आहे.सन २०१७ मध्येही असेच मोठे नुकसान झाले होते.शालेय विद्यार्थी,प्रवासी यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाची उंची वाढवावी.नदीपात्रातील पूर नियंत्रण रेषेच्या आतील अतिक्रमण काढण्यात यावीत, ग्रामसचिवलयाची धोकादायक झालेली इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 8 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे