चित्रकला स्पर्धेतून फुले विचारांचा जागर : डॉ. उद्धव शिंदे

चित्रकला स्पर्धेतून फुले विचारांचा जागर : डॉ. उद्धव शिंदे
प्रतिनिधी : धीरज लांडगे
अहिल्यानगर : “महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण, समता आणि समाजसुधारणा यासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेत समाजासाठी कार्य करण्याची गरज आहे.” असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी यावेळी केले.
स्नेहबंध तर्फे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून भिंगार येथील स्वा. सैनिक जानकी कवडे प्रशाला येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेस स्नेहबंध चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानिमित्त माध्यमिक गटातील (इयत्ता ६ वी व ७ वी) विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. शिंदे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शाळेचे संस्थापक डॉ. रविंद्र कवडे, संचालिका सौ. राज कवडे, विस्तार अधिकारी कापरे साहेब, मुख्याध्यापक नंदकुमार लोणकर, निशांत पानसरे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सिराज खान व आभार दीपक पंडित यांनी केले.



