Breaking
ब्रेकिंग

करमाळा तालुक्यात आमदार संजयमामा शिंदे यांना वाढता पाठिंबा

0 3 9 0 8 1

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. 9 /  करमाळा विधानसभा निवडणुकीमध्ये दिवसेंदिवस चुरस निर्माण झालेली असून दिवसेंदिवस आमदार संजयमामा शिंदे गटाला विविध कार्यकर्त्यांसह पक्षांचा, संघटनांचा पाठिंबा वाढू लागला आहे. काल दि. 8 नोव्हेंबर रोजी जनाधार असलेले आर.पी.आयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेश कांबळे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन 2024 च्या करमाळा विधानसभा निवडणुकीत आपण महायुती व महाविकास आघाडीला धडा शिकवणार असून दलित समाजाची संपूर्ण ताकद आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी उभी करणार असल्याचे प्रतिपादन करून या निवडणुकीमध्ये दलित समाज किंगमेकरची भूमिका पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. तसेच आज 9 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केमिस्ट्री भवन करमाळा येथे आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून त्यामध्ये करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आ. संजयमामा शिंदे हेच एकमेव पर्याय असल्यामुळे अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय बापू घोलप व पक्षाचे सर्व पदाधिकारी मंडळी उपस्थित होते. यापूर्वीच जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य गणेशभाऊ चिवटे यांनीही आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. लवकरच ते मोठा मेळावा घेऊन पाठिंबा जाहीर करणार आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी हे सुद्धा पाठिंबा देण्याच्या विचारात आहेत. दिवसेंदिवस आमदार संजयमामा शिंदे यांच्या कॉर्नर सभा व जाहीर सभेमध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून त्यांचा वाढता पाठिंबा विरोधकांची डोकेदुखी ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे