पुणे सुरक्षा या संदर्भात शौर्य व समर्पण पुरस्कार मा. शंकर शाहुराव खटके यांना प्रदान

पुणे सुरक्षा या संदर्भात शौर्य व समर्पण पुरस्कार मा. शंकर शाहुराव खटके यांना प्रदान
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
ओम शांतीचे पुरस्कर्ते प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थानचे जेष्ठ उपासक आदरणीय शाहुराव खटके, तांबवे(माढा) यांचे सुपुत्र तथा सहाय्यक कमिशनर शंकरराव खटके पुणे यांना पोलीस सुरक्षा या संदर्भात नुकताच शौर्य, समर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पोलीस सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल
पुण्यातील नामांकित सुरक्षा संस्था, आणि पुणे पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षा यंत्रणा पुणे यांचेकडून आपल्या सेवेत आपल्या विभागात सुरक्षा प्रदान करणाऱ्या, एकही केस घडू न देणाऱ्या, शांतता, सुव्यवस्था स्थिर ठेवणाऱ्या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल सन्मान सत्कार करून प्रमाणपत्र ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान सोहळा नुकताच पुणे येथे पार पडला.
पोलीस प्रशासनाच्या शांतता व सुव्यवस्था मध्ये मोरपीस खोवल्यामुळे पुणे जिल्हा व सोलापूर जिल्ह्यामध्ये कौतुकाचा वर्षाव व अभिनंदन होते आहे.
यापूर्वी यासाठी एक सर्वे केला जातो त्यामध्ये पुण्या साठी प्रामाणिक आणि धाडसी कामगारी करणारे पोलीस अधिकारी मा. शंकर शाहुराव खटके पाटील, मुळगाव तांबवे,माढा, येथील असून ते सहाय्यक पोलीस कमिशनर, पुणे या पदावर विराजमान आहेत.
यांचा सन्मान सत्कार मा महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक मा. डी शिवानंदन यांच्या शुहस्ते प्रदान करण्यात आला.
याचे अगोदर असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत ज्यांचं कार्य चांगले असते ते पुरस्काराला प्राप्त होतात असे उदगार विचारपीठावर डी.शिवानंद यांनी व्यक्त केले
या पुरस्काराने खटके पाटील परिवार आनंदित झाला असून ग्रामपंचायत तांबवे या गावात नागरी सत्कार होण्याची माहिती जेष्ठ नागरिकांतून मिळते आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे राज्य संघटक विष्णू आप्पा आंदळकर, राज्य संपर्क प्रमुख संजयकुमार राजेघोरपडे,
सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किसन कांबळे सर, सौ रेखा परदेशी उत्तर विभाग महिला संपर्क प्रमुख मा पद्मजा इंगवले, महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख, नगर जिल्हा महिला प्रमुख सौ सुषमा परदेशी, मा गव्यसिध्द अतुलजी घाडगे, आरोग्य मार्गदर्शक करमाळा गोरख साठे, बारामती अश्या सामाजिक संघटना, पोलीस मित्र संघटना,मागासवर्गीय शिक्षक संघटना यांचे वतीने अकलूज येथे पुनः सत्कार, सन्मान सोहळा होणार असल्याची माहिती पोलीस मित्र संघटनेचे राज्य संघटक विष्णू आप्पा आंधळकर यांनी दिली आहे..!



