Breaking
ब्रेकिंग

आदिनाथ साठी भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकाऱ्यांचे अर्ज दाखल

0 3 9 0 2 1

आदिनाथ साठी भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकाऱ्यांचे अर्ज दाखल

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १७/ आजिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया चालू असताना आज शेवटच्या दिवशी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी सांगितले आहे की आजिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही ताकदीनिशी लढणार आहोत. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून कारखाना सुस्थितीत आणू असे मत गणेश चिवटे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, काकासाहेब सरडे, सोमनाथ घाडगे, अमोल पवार, किरण बागल, दादासाहेब सरडे, दादासाहेब देवकर, लक्ष्मण शेंडगे, सचिन गायकवाड, जयंत काळे पाटील, किरण शिंदे, गणेश गोसावी, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे