Breaking
ब्रेकिंग

थंडीमुळे रेल्वेस्टेशन वर कुडकुडत असलेल्या गरजूना मिळावी उब

भाजपाचे पंडित खुडे यांच्या वाढदिवसा निम्मित ब्लॅंकेट वाटप

0 3 9 0 2 0

थंडीमुळे रेल्वेस्टेशन वर कुडकुडत असलेल्या गरजूना मिळावी उब

भाजपाचे पंडित खुडे यांच्या वाढदिवसा निम्मित ब्लॅंकेट वाटप

प्रतिनिधी : महेश कांबळे

नगर-     वाढदिवस म्हटले कि सर्व काही आले, सध्या तर फ्लेक्स बोर्ड लावणे व रस्त्यावर केक कापणे किंवा हॉटेल मध्ये पार्टी करणे पण हे सर्व टाळून ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले.’ राष्ट्रसंतांचे हे वचन समजणे सोपे, पण ते प्रत्यक्ष अंगिकारायला संवेदनशील मनाची गरज असते. असे संवेदनशील मन घेऊन रंजल्या गांजल्यांच्या सेवेलाच धर्म मानणारे भारतीय जनता पार्टी केडगाव मंडल वंचित आघाडीचे उपाध्यक्ष पंडित खुडे यांचा वाढदिवस मात्र सर्व खर्चाला फाटा देत थंडीमुळे रेल्वेस्टेशन वर कुडकुडत असलेल्या गरजूना ब्लँकेट वाटून करण्यात आला व त्यांना मायेची उब मिळाली
यावेळी सुभाष वाघमारे, गणेश पेटारे,मनोज ठाकूर,विकास वाघमारे,लखन पेटारे,रामभाऊ सकट,राहुल साबळे,संकेत लोखंडे,विशाल तोरडे,संदिप भगुरे,आनंद गुज्जर,बाबू पाचारणे आदी उपास्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी रेल्वेस्टेशन वर थंडीत कुडकुडणाऱ्या गरीब, निराधारांना ब्लँकेटद्वारे मायेचे उबदार पांघरूण घातले
थंडीचा जोर आता वाढत चालला आहे.श्रीमंत असो वा गरीब थंडीचा तडाखा सर्वांनाच सोसावा लागतो.या अवस्थेत रस्त्याच्या कडेला, फूटपाथवर, डिव्हायडरवर,मंदिराच्या आश्रयाने,बसस्टॉपवर,रेल्वे स्टेशनवर अनेक ठिकाणी गरीब,निराधार,निराश्रित माणसे थंडीमुळे कुडकुडत झोपलेली असतात.आशा लोकांना सर्वानी मदत करावी असे आवाहन पंडित खुडे यांनी यावेळी बोलताना केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे