Breaking
ब्रेकिंग

हातवळण येथील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन; प्रशासनाकडून तातडीची कार्यवाही- पै.दादासाहेब दरेकर

0 7 6 9 4 4

हातवळण येथील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन; प्रशासनाकडून तातडीची कार्यवाही- पै.दादासाहेब दरेकर

अहिल्यानगर /  प्रतिनिधी : संजय भापकर

नगर तालुक्यातील हातवळण येथील सिना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे उपविभाग, सिंचन भवन येथे ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने उद्या, दि. ९ डिसेंबरपासून काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.मागील अतिवृष्टीत हा बंधारा वाहून गेल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. काम सुरू न झाल्यास ८ डिसेंबर रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र कोणतीही दखल न घेतल्याने आज सहायक अभियंता श्रेणी–१ यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.यावेळी झालेल्या चर्चेत अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे अभियंता थोरात साहेब व भोसले मॅडम यांच्या कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी उद्या दुपारपर्यंत २ पोकलेन मशीन व २ डंपर हातवळण येथे कामासाठी आणण्यात येणार असल्याचे लेखी पत्र देण्यात आले. दहिगाव येथील पोकलेन मशीन सकाळी ११ वाजेपर्यंत स्थलांतरित करण्यात येईल व त्यानंतर तात्काळ पुनर्भरणाचे काम सुरू होईल, अशी ग्वाही देण्यात आली.
यावेळी गावचे सरपंच बाळासाहेब मेटे, नगर तालुका भाजपा अध्यक्ष पै दादासाहेब दरेकर, नानासाहेब जाधव, दिलीप लाळगे, भाऊ साके, शरद नवसुपे, माऊली मिसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे