करमाळा नगरीमध्ये सुरताल संगीत विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय संगीत नृत्य महोत्सव मोठया उत्साहात साजरा
करमाळा नगरीमध्ये सुरताल संगीत विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय संगीत नृत्य महोत्सव मोठया उत्साहात साजरा
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. २६/ श्री कमलाभवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालय करमाळा यांच्यावतीने पंडित कै. के. एन बोळंगे गुरुजी आणि कै. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत नृत्य महोत्सवाचे आयोजन करमाळा येथील विकी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. या महोत्सवा साठी देशातील वेगवेगळ्या राज्यातून आणि परदेशातूनही अनेक दिग्गज कलाकारांनी आपली हजेरी लावली. सूरताल संगीत विद्यालयाच्या वतीने संगीत क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सुर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांना गौरविण्यात आले.
यामध्ये पं. सुदर्शन राजोपाध्याय (नेपाळ-सरोद) यांना सुरताल संगीत शिरोमणी पुरस्कार, डॉक्टर दुमिथा गुणवर्धन (श्रीलंका- कथक) यांना सुरताल नृत्यभूषण पुरस्कार, श्रीमती बंदना बरूआ (गुवाहाटी-सत्रीय) यांना सुर ताल नृत्य शिरोमणी पुरस्कार, तंन्नी चौधरी (कोलकत्ता-कथक) यांना सुरताल नृत्य कलानिधी पुरस्कार तसेच करमाळ्यातील प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. महेंद्र नगरे यांना सुरताल करमाळा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांना यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने सुद्धा प्रमाणपत्र सन्मान चिन्ह आणि पैठणी देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्त कलाकारांनी आपली कला सादर करुन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या समारंभाप्रसंगी नवभारत च्या संचालिका सौ सुनिता देवी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की सुरताल संगीत विद्यालयाने संगीत कलेच्या माध्यमातून राज्यांच्याच नाही तर देशाच्या सुद्धा सीमा पार केल्या आहेत. संगीत कला ही मानवाला एकत्र आणण्याचे एक प्रभावी साधन असून सुरताल संगीत विद्यालय ने आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय संगीत नृत्य महोत्सव हा सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारा आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, तहसीलदार सौ. शिल्पाताई ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, पिंक रिवोल्युशन महाराष्ट्र राज्य च्या संस्थापिका श्रद्धा जवजांळ, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील,अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण केकान, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक भाई खाटेर, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. कविता कांबळे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर, नगसेविका सौ संगिताताई खाटेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भरत भाऊ आवताडे, जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अजिंक्य पाटील, नगरसेवक महादेव फंड नगरसेवक अतुल फंड, सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, संघर्ष न्युजचे सिध्दार्थ वाघमारे, टीव्ही नाईन चे शितलकुमार मोटे, संपूर्ण पत्रकार तसेच राष्ट्रवादी उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रसाद जगताप, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर म्हणाले की बाळासाहेब नरारे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून करमाळा तालुक्याचे नाव महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशात करण्याचे काम केले असून त्यांच्या कार्याचा आपणास सार्थ अभिमान वाटतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला बीड, लातूर, बारामती, सोलापूर, पुणे इत्यादी ठिकाणाहून विविध क्षेत्रातील मान्यवर व रसिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामध्ये प्रकाश शिंदे, अजित कणसे, डॉ. महेश वीर, डॉ. महेश अभंग, विजय खंडागळे, खांडेकर सर, कुलकर्णी सर, गंगणे सर प्राध्यापक फाटक सर, शिवराज चिवटे इत्यादी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक बरडे, संतोष पोतदार, दिगंबर पवार, निलेश कुलकर्णी कदम सर, सुहास कांबळे, सतीश वीर, नवनाथ थोरात, आबा साने, उमेश मगर यांनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमाचे माझ्या शुभेच्छाप्रास्ताविक सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर सूत्रसंचालन सौ. रेश्मा जाधव, सौ संध्या थोरे, अर्चना सोनी यांनी केले तर आभार शिंदे सर यांनी मानले.



