Breaking
ब्रेकिंग

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन

0 3 9 0 5 0

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन

प्रतिनिधी :- पंकज पाटील

चोपडा :- महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. नोबेल पुरस्कार प्राप्त, भारतरत्न डॉ. सी.वी. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील, विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक डाॕ. रमाकांत महादू बागूल, डाॅ. लालचंद भाऊलाल पटले, डाॅ. संदीप रामराव पाटील, डाॅ. कुणाल दामोदर गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि दिपाली पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता सहावी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांसारख्या विविध शास्त्रांतील ज्ञानावर आधारित प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. उपयोजित विज्ञानावर आधारित विविध प्रतिकृतींचा समावेश देखील या विज्ञान प्रदर्शनात होता. विविध आकर्षक व माहितीपूर्ण विज्ञान प्रकल्पांच्या माध्यमाने दैनंदिन समस्यांवर उपाय या प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुचविले. लेसर सुरक्षा प्रणाली, स्मार्ट पूल, , मेंदू, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि हृदय प्रतिकृती, हेमोडायलिसिस कार्यरत प्रतिकृती, रोबोटिक अग्निशमन यंत्र, वायरलेस वीज प्रेषण प्रणाली, स्मार्ट सिटी, हसत खेळत वीज निर्मिती, भूकंप शोधक प्रणाली, प्रदूषणे, रेन वॉटर डिटेक्टर, शेती विषयक आधुनिक पद्धती, कचरा व्यवस्थापन, हायड्रोलिक कार, फायर अलार्म सिक्युरिटी, स्मार्ट फार्मिंग, आपत्ती व्यवस्थापन, स्पायड्रोन, स्टीम इंजिन, गायरोस्कोप, इलेक्ट्रोप्लेटिंग, विद्युत सुवाहक व दुर्वाहक पदार्थ यांसारख्या विविध मॉडेल्सचा समावेश या विज्ञान प्रदर्शनामध्ये होता.

इयत्ता सहावीच्या गटातून वृक्षाली सोनवणे, समृद्धी बडगुजर, नेहा पाटील या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. इंद्रायणी पाटील, नक्षत्रा खैरनार या विद्यार्थीनींनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. प्राजक्त कोळी, जुनैरा खान या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

इयत्ता सातवीच्या गटातून शाश्वत कुणाल गायकवाड या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. सुशील सोनवणे, खरांशु सोनवणे, सार्थक कदम, आदित्य पाटील‌ या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. जान्हवी पाटील, मंजुश्री शिंदे, क्रितिका शर्मा, यश धनगर या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
इयत्ता आठवीच्या गटातून सुजल लभाने, निलेश मोरे, जीत पाटील या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. अंश पाटील द्वितीय क्रमांक, कोशिका शिंपी, चैताली बाविस्कर, वैष्णवी शिरसाठ या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

आयटी प्रकल्प अंतर्गत इयत्ता सहावीचा विद्यार्थी अंश जाधव यांने प्रथम क्रमांक प्राप्त केला. अंश पाटील, विराज गुजराथी या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विज्ञान प्रदर्शनाला पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. ‘
या विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक विशाल मराठे, अर्चना जैन आणि पूनम पाटील यांचे सहकार्य लाभले. विज्ञान दिनानिमित्त शाळेतील कलाशिक्षक शकील अहमद यांनी सुरेख फलक रेखाटन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विज्ञान शिक्षक विशाल मराठे अर्चना जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका अर्चना जैन यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे