Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांची नाशिक येथे भेट घेऊन एकल शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन

0 3 9 0 6 4

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांची नाशिक येथे भेट घेऊन एकल शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

नाशिक :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस प्रदीप पेखळे यांच्या नेतृत्व महाराष्ट्रातील एकल शिक्षकांना बदली प्रक्रियेत न्याय मिळण्यासाठी आज महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांची नाशिक येथे भेट घेऊन एकल शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री व साहेबांसमवेत चर्चा करण्यात आली.यावेळी शिक्षक संघाचे  नेते पृथ्वीबाबा शिरसाठ सर , प्रदीप पेखळे सर , सचिन वडजे सर , विलास पेलमहाले सर , शशिकांत बोरसे सर आदींनी एकल कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत साहेबांना माहिती दिली.निवेदनात म्हटले आहे की इतर संवर्गाला न्याय देत असताना संवर्ग 4 वरती अन्याय होऊ नये कारण बदली प्रक्रियेमध्ये कायम संवर्ग चार वरती मोठ्या प्रमाणावर अन्याय होतो व त्या बांधवांना कायम गैरसोयीच्या ठिकाणी नोकरी करावी लागते त्यामुळे त्यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात यावी शिक्षकांच्या बदल्या सेवा जेष्ठतेप्रमाणे करण्यात याव्या या व इतर मागण्या एकल शिक्षकांच्या वतीने करण्यात आल्या नामदार मंत्री महोदय साहेबांनी सर्व मागण्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला व एकल कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन दिले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे