भिंगारमध्ये प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव उत्साहात; भव्य शोभायात्रेने दुमदुमली भिंगारची नगरी

भिंगारमध्ये प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव उत्साहात; भव्य शोभायात्रेने दुमदुमली भिंगारची नगरी …
अहिल्यानगर / संवेद वायकर
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त भिंगार शहरात अतिशय उत्साही आणि भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या भव्य सोहळ्याचे आयोजन ‘प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती, भिंगार’ आणि ‘सकल हिंदू समाज’ यांच्या वतीने करण्यात आले होते. ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर राममय झाला होता.
दक्षिणमुखी हनुमान मंदिरापासून सुरू झालेली ही मिरवणूक भिंगार वेस येथील मारुती मंदिरापर्यंत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
मिरवणुकीचा मार्ग आणि उत्साह विजयनगर चौकातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. तेथून ही मिरवणूक पंचशील वेस, खळेवाडी, नेहरू चौक, ब्राह्मण गल्ली मार्गे भिंगार वेस येथील मारुती मंदिरात पोहचली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि भगवे ध्वज लावून स्वागत करण्यात आले. सकल हिंदू समाजाच्या वतीने ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.
आकर्षक देखावे आणि वेशभूषा या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती आणि बाहुबली हनुमानाचे दोन जिवंत देखावे होते, ज्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. चि. स्वराज सतीश मोरे याने प्रभू श्रीराम, कु. संस्कृती सतीश मोरे आणि कु. रोशनी लाहुंडे यांनी सीतामाता आणि चि. शौर्य अंकुश तरवडे याने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली होती. या चिमुकल्यांच्या वेशभूषेचे सर्वांनी कौतुक केले.
सांस्कृतिक आणि साहसी प्रात्यक्षिके मिरवणुकीत ढोल-ताशा पथकाच्या तालावर तरुणाई थिरकली, तर दुसरीकडे लाठी-काठी आणि तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून हिंदुत्ववादी शौर्याचे दर्शन घडवण्यात आले.
हरिओम माऊली भजनी मंडळाच्या भजनांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. भक्तांचा प्रतिसाद यावर्षी लक्षणीय होता.
प्रबोधनात्मक उपक्रम केवळ उत्सवच नव्हे तर सामाजिक भान जपण्यासाठी या मिरवणुकीत ‘लव जिहाद’ या विषयावर प्रबोधन करण्यात आले. समाजातील ज्वलंत विषयावर जनजाग्रुती करण्याचा हा प्रयत्न उपस्थितांनी वाखाणला.
मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्यासाठी श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष व बजरंग दल जिल्हा संयोजक श्री सतीश (नाना) मोरे, युवा उद्योजक श्री.महेश झोडगे, श्री.रोहित सोनूशेठ भुजबळ, सचिन जाधव, युवा उद्योजक श्री.अमित खामकर, युवा उद्योजक सुरजजी रवे, उद्योजक सचिन सुसे, उद्योजक श्री सचिन पेंडूरकर, श्री अंकुश तरवडे, श्री. सुरज रवे, श्री अशोक चेमटे, श्री अभिषेक भगवाने,अजय गायकवाड, सुमित नकवाल,तुषार लोंढे, शुभम जगताप, राहुल लिपारे, जितेन नायर, आदी ससाने, उद्धव शिंदे, जगताप सर,ओंकार फिरोदे, शिवम भंडारी, दिनेश हिरगुडे, राहुल गुलदगड,यांसह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्याने रामभक्त उपस्थित होते.
प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती, भिंगार आणि सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी मोठे परिश्रम घेतले.



