Breaking
ब्रेकिंग

शालेय कुराश स्पर्धेत ऋचा राकेश बोगा हिची उल्लेखनीय कामगिरी ; महाराष्ट्र संघासाठी कास्य पदकाची कमाई

0 8 6 7 0 9

शालेय कुराश स्पर्धेत ऋचा राकेश बोगा हिची उल्लेखनीय कामगिरी ; महाराष्ट्र संघासाठी कास्य पदकाची कमाई

प्रतिनिधी : संवेद वायकर

अहिल्यानगर :  सहारनपूर (उत्तरप्रदेश ) येथे नुकत्याच झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धेत अहिल्यानगर, सिद्धीबाग येथील यंग मेन्स जुडो हॉल ची खेळाडू ऋचा राकेश बोगा हिने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र संघासाठी कास्य पदक पटकाविले. २७ नोव्हेंबर रोजी इंदापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील ४४ किलो खालील गटात सुवर्ण पदक प्राप्त करून तिची राष्ट्रीय स्पर्धे करिता महाराष्ट्रतुन निवड करण्यात आली होती. यापूर्वीही तिने ज्युडो, कुराश या खेळात प्राविण्य प्राप्त केले आहे. सध्या ती अ.नगर येथील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे इ. ९ वी मध्ये शिक्षण घेत असून तिला यंग मेन्स जुडो हॉल चे प्रशिक्षक व मार्गदर्शक प्रा. संजय धोपावकर, महाराष्ट्र कुराश असो. चे अध्यक्ष अंकुश नागर, आदित्य धोपावकर याचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

या खेळाडूचे आमदार संग्राम भैया जगताप , नगरसेवक धनंजय जाधव, न्यू कॉलेजचे प्राचार्य तांबे सर, संजय धोपावकर सर,मुख्याधापक दुगड सर, प्रा. कैलास साबळे, प्रा. करपे सर, रमेश बोगा, राजेंद्र बोगा, सुशांत जाधव , ज्ञानेश्वर गालपेल्ली, अमर येमूल, निर्मला बोगा, सौ. पल्लवी बोगा तसेच सर्व नातेवाईकांनी व वृद्धांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे