Breaking
ब्रेकिंग

नारायणडोहो ग्रामस्थांनी शोकसभा घेत स्व. आ.शिवाजी कर्डिलें विषयी व्यक्त केल्या ‘या’ भावना

नगर तालुक्याचा महा लोकनायक हरपला. . .

0 8 6 5 1 0

नारायणडोहो ग्रामस्थांनी शोकसभा घेत स्व. आ.शिवाजी कर्डिलें विषयी व्यक्त केल्या ‘या’ भावना

नगर तालुक्याचा महा लोकनायक हरपला. . .

नारायणडोहो / प्रतिनिधी :  रफिक शेख

स्व. शिवाजीराव कर्डिले अपक्ष म्हणून पहिलीच विधानसभा निवडणूक लढवत असताना अहिल्यानगर तालुक्यातील पहिले नारळ फोडण्याचा कार्यक्रम श्री चांगदेव मंदिराच्या नारायणडोहो परिसरातील नागरिकांनी त्यांना मोलाची साथ दिली. त्यामुळे स्व. कर्डिले यांचे नारायणडोहो परिसरावर शेवट पर्यंत विशेष प्रेम राहिले. त्यांनी येथील स्थानिक नेवृत्वाला तालुक्यात काम करण्याची संधी दिली. गोरगरीबांना न्याय देणार नेतृत्व हरपल्याने नारायणडोहो ग्रामस्थांच्या वतीने स्व. आ. शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले.

पूर्वी नारायणडोहो गावात श्री चांगदेव मंदिरात प्राचारचा नारळ फुटत असायचा. गावातील नागरिकांना टाकळी काझी ठिकाणी बँकेत जाण्यासाठी अडचण होत होती यावर ग्रामस्थांनी विषय कर्डीले यांना सांगितले त्यावेळी त्यांनी नारायणडोहो येथे उपशाखा त्वरित मंजूर केली.

अहिल्यानगर तालुक्यातील नारायणडोहो येथे स्व. आ. शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने येथील श्री चांगदेव मंदिरा समोर ग्रामस्थांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी अनेकांनी स्व. कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला . नारायणडोहो परिसरावर कर्डिले यांचे विशेष प्रेम असल्याने अडचणीचे प्रश्न सोडविण्यास स्व . कर्डिले यांनी विशेष प्राधान्य दिले . काम घेऊन गेलेला कोणत्या पक्षाचा आहे, तो आपल्या विरोधी काम करतो का ? या भानगडीत न पडता त्यांनी सर्वांना सहकार्य केल्याने सर्वांचेच त्यांच्यावर विशेष प्रेम होते. सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे अन् गोरगरीब जनतेच्या हितासाठी झटणारे नेतृत्व हरपल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी आसाराम साठे,आनंदा साठे पोपट साठे सर, अविनाश साठे सर, संतोष साठे बाबासाहेब साठे,देविदास साठे, अंबादास मिसाळ, भाऊ शिंदे, मच्छिन्द्र साठे, किरण गंगार्डे, बाबुराव बेद्रे, निळू ठोंबरे, प्रकाश म्हस्के, सोपान जायभाय,सुरेश शिंदे, आदींसह ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे संचालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे