शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्रीदेवीचामाळ येथील श्रीकमलाभवानी मंदिर व परिसरात महास्वच्छता अभियान संपन्न
करमाळा : प्रतिनिधी : सचिन जव्हेरी
करमाळा : दि . ८ ऑक्टोबर : आगामी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त राजेरावरंभा मित्र मंडळ श्रीदेवीचामाळ व देवराई ग्रुप च्या वतीने श्री जगदंबा कमलाभवानी मंदिर येथे महास्वच्छता अभियान नुकतेच संपन्न झाले. करमाळा शहरालगत असलेले प्राचीन करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्रीकमलाभवानी मंदिराची व संपुर्ण परिसराची होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त राजेरावरंभा मित्र मंडळ व देवराई ग्रुपच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्याचे नियोजीत करून संपुर्ण करमाळा तालुक्यात यासाठी आवाहन करण्यात आले होते. बघता-बघता हजारो भाविक-भक्त स्वच्छतेसाठीचे आवश्यक साहित्य घेवून स्वयंस्फुर्तीने श्रकमलाभवानी मंदिर दाखल झाले. यामध्ये सर्व स्तरातील भाविकांनी मोठ्या उत्साहात व आनंदात सहभाग नोंदविल्याने मंदिर समिती;ग्रामस्थ व राजेरावरंभा मित्र मंडळ आणि देवराई ग्रुपने सर्वांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. या स्वच्छता मोहीम मध्ये मुख्य मंदिर, सर्व वावर्या, दीपमाळ कमला भवानी वाहन, 96 पायर्यां, बारव ,वाहन पार्किंग परीसर , बागबगीचा परीसर स्वच्छ करण्यात आला आहे. ही स्वच्छता मोहीम ग्रामपंचायत श्रीदेवीचामाळ, राजेराव रंभा तरूण मंडळाचे कार्यकर्ते व देवराई ग्रुप श्रीदेवीचामाळ यांनी आयोजन व नियोजन केले कमला भवानी ट्रस्ट यांनी सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली.
Screenshot
कमला भवानी मंदिर स्वछता मोहीम 2026
सहभागी भाविक-भक्त : यशवंतराव चव्हाण महाविद्यालया NCC व NSS;संत निरंकारी मंडळ,करमाळा, स्वराज अकॅडमी दाहिखिंडी ,योद्धा करियर अकॅडमी जेऊर,देवळाली स्वछता ग्रुप, युनिव्हर्सल करिअर अकॅडमी करमाळा, ग्लोबल सायंन्स इन्स्टिटयूट करमाळा, जिद्द करियर अकॅडमी करमाळा, कमलाई करियर अकॅडमी पांडे रोड, मराठा फोर्स करमाळा, श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र करमाळा, करमाळा होमगार्ड पथकातील होमगार्ड,जेष्ठ नागरिक,महिला,विद्यार्थी-विद्यार्थीनी,यांसह शहर व तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. विशेष कार्यामध्ये श्रीदेवीचामाळ येथील प्रसिद्ध बागायतदार मोरे बंधु यांनी HTP पंपाने मंदिर स्वच्छता करण्याचे काम केले.