निर्मलनगर प्रतिष्ठान ने साकारले साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन
शारदीय नवरात्र उत्सवात निर्मलनगर प्रतिष्ठान ने केली आकर्षक सजावट
निर्मलनगर प्रतिष्ठान ने साकारले साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन
शारदीय नवरात्र उत्सवात निर्मलनगर प्रतिष्ठान ने केली आकर्षक सजावट

प्रतिनिधी : संवेद वायकर
नगर : अश्विन शुक्ल प्रतीपदेच्या मुहूर्तावर अहिल्यानगर च्या सावेडी या उपनगरातील निर्मलनगर येथील “निर्मलनगर प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन मा . नगरसेवक निखिलजी वारे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी देवीची स्थापना व पूजा करून घटस्थापना करण्यात आली. स्थानिक युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता .

प्रतिष्ठानचे संस्थापक अजय हिवाळे आणि अध्यक्ष अभिषेक खामकर यांनी उत्तम नियोजन करून उत्सवाची शोभा वाढवली आहे .
परंपरेप्रमाणे युवकांनी प्रसिद्ध असलेल्या मोहटादेवी गडावरून आणलेल्या ज्योतीचे मंडळाच्या महिलांच्या वतीने जल्लोशात स्वागत करण्यात आले . यथोचीत पुजा करून ज्योतीचे रुपांतर नंदादीपामध्ये करण्यात आले. हा नंदादीप दिवा नऊ दिवस अखंड तेवत राहणार आहे. नवरात्र काळात सर्व ठिकाणी आदिमायेचा गजर करण्यात येतो. सकाळी व सायंकाळी सार्वजनिक आरती करण्यात येते .

प्रतिष्ठानचे संस्थापक अजय हिवाळे यांनी सांगितले कि, विविध आरोग्य शिबिरे घेण्यात येत असून दररोज उपस्थित महिलां मधुन लकी ड्रॉ पद्धतीने एका पैठणी साडीचे वितरण करण्यात येत आहे . विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम नवरात्रीत करत आहोत . विशेष बाब म्हणजे दांडिया खेळण्यासाठी दरवर्षी युवक युवतींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे हिवाळे यांनी सांगितले .
भाविक भक्तांना या शारदीय नवरात्रीय देवीवरील श्रद्धेचे अनेक अनुभव येत असल्याचे भाविकांमधून सांगण्यात येत आहे .या शुभ प्रसंगी अनेक महिला , युवक स्वयंसेवक या काळात कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करत असतात.



