अमळनेर ते गलवाडे राज्य महामार्ग ६ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करावी
अमळनेर ते गलवाडे राज्य महामार्ग ६ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करावी
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर कडून गलवाडेकडे जाणारा राज्य मार्ग ६ वरील मुंदडा नगर २ च्या पुढे श्री. -केले सरांच्या घराजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करणे याविषयी उपरोक्त विषयानुसार विनंती की, अमळनेर हुन गलवाडेकडे जाणारा राज्य मार्ग ६ हा, गलवाडे, झाडी, भरवस, लोन-पंचम, एकलहरे, शहापूर अशा अनेक गावातील गावकऱ्यांसाठी, रोजचा अमळनेर येण्या-जाण्याचा मार्ग आहे. तसेच अमळनेर आगाराच्या बेटावद, शिंदखेडा, नरडाणा, दोंडाईचा, अशा अनेक बसेस प्रवाशांची वाहतूक या रस्त्यावरून करतात. परंतु जवळपास दोन ते तीन महिन्यापासून या रस्त्यावर मुंदडा नगर २ च्या पुढे, श्री. केले सरांच्या घराजवळील वळणावर मोठा खड्डा पडलेला आहे. आणि ४ ते ५ दिवसाच्या वाळवाच्या तथा अवकाळी पावसामुळे सदर खड्ड्याचा विस्तार वाढत आहे. तेथे सर्व लहान-मोठी वाहने चालवतांना, चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात पाणी साचल्याने, खड्ड्याचा अंदाज चालकांना येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर रस्ता हा १० वर्षे ठेकेदाराने मेंटेनन्स करण्याच्या करारावर दिलेला आहे. तरी त्वरित रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती ठेकेदाराकडून करण्यास यावी, ही नम्र विनंती.



