Breaking
ब्रेकिंग

२१ वर्षांनंतर जैन गुरुकुलमधे पुन्हा भरली शाळा ;  माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्यात दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

0 8 9 8 2 4

२१ वर्षांनंतर जैन गुरुकुलमधे पुन्हा भरली शाळा ;  माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्यात दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

प्रतिनिधी : आसावरी वायकर

सोलापूर : श्री ऐ. प. दिगंबर जैन पाठशाळा संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००४-०५ च्या दहावीच्या (अ, ब, क, ड) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल २१ वर्षांनंतर सर्व मित्र आणि आजी-माजी शिक्षक पुन्हा एकत्र आले आणि शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा मि ळाला.

प्रारंभी विद्येची देवता सरस्वती, गुरुकुल शिक्षण प्रणालीचे प्रणेते परमपूज्य १०८ समंतभद्र महाराज व संस्थेचे माजी सचिव श्रद्धेय भाऊसाहेब गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, माजी मुख्याध्यापक प्रेमचंद मेने, वर्गशिक्षक अशोक धोंगडे, अरुण धुमाळ, श्रीरंग माळी, सुभाष नागरसे, संजय भस्मे, तांत्रिक विभाग प्रमुख राजेश मोहोळकर, सुरेश टोपरे आणि दिपक कलढोणे या गुरुजनांची प्रमुख उपस्थिती होती. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा मानाचा फेटा, मायेची शाल आणि रोप देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला तसेच शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

अलीकडेच राज्यस्तरीय शैक्षणिक गुणवत्ता मूल्यांकनात या प्रशालेला + श्रेणी प्राप्त झाल्याचे अभिमानास्पद असल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र संघटना स्थापन करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्नेहमेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मल्लिनाथ आळंगे, अविनाश शिराळकर, विरेंद्र सट्टे, प्रशांत नागणकिरे, किरण कुलकर्णी, पंकज यादव, रोहित बोरामणी, रोहन भांडेकर, सागर हिरेहब्बू, ओंकार भांगे, गौस शेख, राजेश इंगोले, विरपक्षप्पा लोणी, नागराज हुमनाबादे, सुनिल कोकणे, सचिन जिरे, कान्हा कदम स्वप्नील आखाडे आणि अतिश धेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 8 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे