Breaking
ब्रेकिंग

शेतकऱ्याचे कैवारी बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सह राहुरीत शेतकऱ्याच्या कर्जमाफी साठी 24 जुलै रोजी चक्काजाम आंदोलन*

0 8 6 5 1 1

*शेतकऱ्याचे कैवारी बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सह राहुरीत शेतकऱ्याच्या कर्जमाफी साठी 24 जुलै रोजी चक्काजाम आंदोलन*

राहुरी तालुका जावेद शेख

शेतकऱ्यांचे कैवारी दिव्यांगाचे नेते मा श्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची कर्जमाफीसह मालाला हमीभाव इतर मागण्यासाठी येत्या गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 रोजी सकाळी 09:00ते 10या वेळेत मार्केट यार्ड समोर राहुरी अहिल्यानगर मनमाड हायवेवर चक्काजाम आंदोलनातं. करण्यात येणार आहे. आज पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब व तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. सरकारने निवडणुकीच्या अगोदर दिलेले आश्वासन पाळले नाही शेतकरी कर्जमाफीचे पूर्ण न केल्याने गेले दोन महिन्यापासून बच्चुभाऊ कडू यांनी उपोषणे आंदोलने उतारा कोरा कोरा पायी आंदोलन केले.येत्या 24 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे तसे आंदोलन आपल्या राहुरीतही या रस्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी माजी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे सह विविध संघटना पदाधिकारी,मेंढपाळ,शेतकरी, शेतमजूर कामगार,दिव्यांग, आणि प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलना त सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख तालुका अध्यक्ष योगेश लबडे उपाध्यक्ष विजय म्हसे तालुका सल्लागार बाबुराव शिंदे, रवींद्र भुजाडी चंद्रकांत रेबडे, महेश शेलार, रमेश शेलार, जुबेर मुसानीं,विजय सूर्यवंशी, फिरोज मन्सुरी, संजय देवरे,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे