Breaking
ब्रेकिंग

अमळनेरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुविधांचा अभाव ; ग्राहकांची तक्रार

अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने दिले निवेदन

0 8 6 6 8 2

अमळनेरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुविधांचा अभाव ; ग्राहकांची तक्रार

अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने दिले निवेदन

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर : अमळनेर येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर सिलिंगला ५/५ फुटावर पंखे आहेत, परंतु ज्यांच्या जीवावर बैंक चालते, ते आम्ही ग्राहक, आमच्यासाठी अत्यावश्यक सुविधा देखील नाहीत, त्यात छताला पंखे नाहीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, वयस्कर ग्राहकांसाठी बसायला बाकडे नाहीत.” बँकेत आलेले शेतकरी ग्राहक चिडुन सांगत होते .

सविस्तर माहिती अशी की, अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बी.के. सूर्यवंशी व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्री संदीप घोरपडे यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा अमळनेर चे व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,काँग्रेस कमिटीचे आर्थिक व्यवहार सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी,शाखेत काँग्रेस कमिटीचे खाते उघडणे कामी दि. 24/3/26 रोजी आलो असताना मार्च एंड असल्याने आपल्या शाखेत शेतकरी ग्राहकांची भरपूर गर्दी होती. प्रत्येक काउंटर समोर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रांगेत थांबलेल्या शेतकऱ्यांच्या अंगातून घाम निघत होता. त्यातील काही शेतकरी ग्राहकांनी आमच्याजवळ तक्रार केली की, “कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर ५/५ फुटावर पंखे आहेत, परंतु ज्यांच्या जीवावर बैंक चालते, ते आम्ही ग्राहक, आमच्यासाठी अत्यावश्यक सुविधा देखील नाहीत, त्यात छताला पंखे नाहीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, वयस्कर ग्राहकांसाठी बसायला बाकडे नाहीत.” शेतकरी ग्राहक चिडले, त्यांनी त्वरित जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक चेअरमन साहेब, श्री संजयजी पवार यांना फोन करायला सांगितले. त्यांना फोन करून अडचणी सांगितल्या, आपले बोलणे करून दिले . आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले .
तरी आपल्या बँकेच्या इमारतीत, बाहेरच्या बाजूस, शेतकरी ग्राहकांसाठी पंख्याची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे