Breaking
ब्रेकिंग

प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थीनी अंकिता जैन नेट परीक्षेत उत्तीर्ण 

0 8 6 5 1 1

प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थीनी अंकिता जैन नेट परीक्षेत उत्तीर्ण 

जळगाव जिल्हा प्रतिनिधी:- पंकज पाटील

जळगाव :- अमळनेर प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी एक उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थिनी अंकिता जैन हिने केली आहे. तिने राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.
         या यशाबद्दल तिचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी त्यांनी अंकिता जैन हिचे कौतुक करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, अशा यशस्वी विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा अधिक बळकट होते. या सत्कार समारंभास मराठी विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी अंकिता जैन या विद्यार्थिनीचे अभिनंदन करत तिच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे कौतुक केले. इतर विद्यार्थ्यांनीही तिच्या यशातून प्रेरणा घेऊन शैक्षणिक प्रगती साधावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. रमेश माने, डॉ. विलास गावीत, प्रा. योगेश पाटील, प्रा. तुषार पाटील, प्रा. सागर सैंदाणे आणि प्रा. गोपाळ बडगुजर हे प्राध्यापक उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे