Breaking
ब्रेकिंग

मकाई सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा: रश्मी बागल

0 7 6 9 4 3

मकाई सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा: रश्मी बागल

करमाळा / (विशेष प्रतिनिधी सचिन जव्हेरी) 

मकाई सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असून कारखान्याचे संस्थापक लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांच्या विचारानेच कामकाज सुरू असून कारखान्याच्या विकासाच्या कामांमध्ये किंवा कारखान्याच्या हिताच्या धोरणाच्या आड जर कोणी येत असेल तर त्याची भविष्यामध्ये गय केली जाणार नाही तसेच मकाई कारखाना येत्या काळात क्षमताविस्तार करणार असून मकाई कारखान्याचे कामकाज राजकारण विरहित केलं जाईल कारखाना सुरू नसेल तर सभासदांचे मोठं नुकसान होईल त्यामुळे मकाई कारखाना अविरतपणे चालू राहण्यासाठी व प्रगतीसाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे असे आवाहन भाजपा प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा व राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या संचालिका रश्मी दिदी बागल यांनी आज कारखाना कार्यस्थळावर केले आज कारखाना कार्यस्थळावर श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी प्रारंभी कारखान्याचे संस्थापक राज्याचे माजी मंत्री लोकनेते स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन ज्येष्ठ सभासद शेतकरी जालिंदर झांजुर्णे, धर्मराज जगताप, अंबऋषी भिल, विठ्ठल लोहार व उपस्थित सर्व संचालक मंडळ कारखान्याचे सर्व अधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.त्यानंतर कारखान्याच्या मुख्य इमारतीच्या सभागृहामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत कारखान्याचे जनरल मॅनेजर हरिश्चंद्र खाटमोडे यांनी केले यांनी त्यानंतर श्रद्धांजली ठरावाचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील दळवी यांनी केले त्यानंतर कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचन केले व सर्व ठरावांना उपस्थित सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली आपल्या भाषणात बोलताना चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी कारखान्याच्या कामकाजाचा व प्रगतीचा आढावा घेत मकाई कारखाना आगामी कालावधीमध्ये निश्चितपणे राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवेल त्याचबरोबर मकाई कारखान्याचा क्षमता विस्तार करणार असून वाढीव क्षमतेने कारखान्याचे कामकाज झाल्यानंतर कारखाना पूर्ण क्षमतेने आपलं गाळप करेल कारखान्याच्या हिताच्या व विकासाच्या आड येणाऱ्या गोष्टींना कृपया कोणी थारा देऊ नये व विरोधकांच्या अपप्रचारालाही कोणी बळी पडू नये आपणा सर्वांचे दैवत व कारखान्याचे संस्थापक राज्याचे माजी मंत्री लोकनेते स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांच्या विचारानेच व नेत्या रश्मी दिदी बागल यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे कामकाज सुरू असून आगामी काळामध्ये कारखाना निश्चितच नव्याने भरारी घेईल असा आत्मविश्वास व्यक्त केला तसेच दिवाळीसाठी कामगारांना बोनस देण्याबाबत संचालक मंडळात निश्चितपणे विचार करण्यात येईल असेही श्री भांडवलकर म्हणाले यावेळी आभार प्रदर्शन कारखान्याचे संचालक सतीश निळ यांनी केले तर राष्ट्रगीत गायनाने वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी शेखर जोगळेकर यांनी केले यावेळी आदिनाथ चे माजी चेअरमन धनंजय डोंगरे आदिनाथ चे माजी व्हाईस चेअरमन केरू गव्हाणे मकाइचे जेष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे तसेच मकाई सहकारी कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक मंडळ त्याचबरोबर डॉक्टर विजय रोकडे माजी संचालक नामदेव भोगे महावीर तळेकर रंगनाथ शिंदे काशिनाथ काकडे आदी मान्यवरांसह सर्व विभाग प्रमुख हजारो सभासद हितचिंतक शेतकरी बांधव पदाधिकारी मीडिया प्रतिनिधी पत्रकार व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे